शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील म्हसावद येथे 70 हजारांचे अवैध विदेशी मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:46 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शनिवारी शहादा तालुक्यातील दोन वेगवेगळया ठिकाणी झालेल्या कारवाईत सुमारे 70 हजार रुपयांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आह़ेम्हसावद ता़ शहादा येथील कुंभारगल्लीत कुडाच्या झोपडीत तसेच खेतीया रोड शहादा येथे एका ढाब्यात अवैध विदेशी मद्याची विक्री होत असल्याची माहिती विभागाला ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शनिवारी शहादा तालुक्यातील दोन वेगवेगळया ठिकाणी झालेल्या कारवाईत सुमारे 70 हजार रुपयांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आह़ेम्हसावद ता़ शहादा येथील कुंभारगल्लीत कुडाच्या झोपडीत तसेच खेतीया रोड शहादा येथे एका ढाब्यात अवैध विदेशी मद्याची विक्री होत असल्याची माहिती विभागाला मिळाली़त्यानुसार विभागाच्या वतीने संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली़ सदर कारवाईत वेगवेगळ्या विदेशी मद्याच्या एकूण 538 बाटय़ा (11 बॉक्स) जप्त करण्यात आले आहेत़ कारवाईत सदर मुद्देमालासह मयुर भिकन पाटील, (रा़ म्हसावद ता़ शहादा) व दिपक रविंद्र शर्मा (रा़ एनआरआय कॉलनी, शहादा) यांच्यावर कारवाई करण्यात आली आह़े दरम्यान, आरोपींच्या ताब्यात मिळून आलेले मद्य एकूण 68 हजार 190 इतक्या किंमतीचे आह़े मुंबई दारुबंदी कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सदर कारवाई विभागीय उपआयुक्त नाशिक प्रसाद सुव्रे व नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मनोज संबोधी, जवान एस़एस़ पवार, नितीन ठणके आदींनी केली़