किशोर मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा किनारी असलेल्या डनेल ग्रामपंचायतीच्या राहीपाडा व हिरहीपाडाच्या ग्रामस्थांनी श्रमदान करून सुमारे सात किलोमीटर अंतरावर पाईप टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. चढउतार असलेल्या भागातून सात-आठ दिवस श्रमदान करून ग्रामस्थांनी ही पाईप लाईन टाकली आहे.अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील डनेल ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या राहीपाडा येथे रस्त्यांची सोय नसल्याने हातपंप टाकता येऊ शकले नाही. नाल्यात विहीर आहे मात्र तीदेखील मार्च महिन्यापासून आटली आहे. हिरहीपाडा येथे असलेला एक हातपंप जेमतेम चालतो. त्यामुळे या पाडय़ांवरील ग्रामस्थांना तीन किलोमीटर अंतरावर मोही सागमणपाडा येथील नाल्यात असलेल्या विहीरीवर पाणी भरण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यावर उपाय शोधण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आहुलीच्या ङिा:यातून श्रमदानाने पाईपलाईन करीत डोंगर द:याच्या चढउतार मार्गाने पाणी आणण्याचा विचार केला. येथील ग्रामसेवकांकडे पाईप व इतर साहित्याची मागणी करून दोन्ही पाडय़ातील ग्रामस्थांनी एकत्र येत सात-आठ दिवस-रात्र राबत 500 मीटरचे 14 बंडल पाईपलाईन जोडत व इतर साहित्याचा आधार देत सात किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. हे पाणी राहीपाडय़ाच्या कोरडय़ा पडलेल्या विहिरीत पाणी सोडले तर दुस:या हिरहीपाडा येथे पाईपद्वारे पाण्याची सोय केली. या दोन्ही पाडय़ातील ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी केलेला प्रय} यशस्वी झाला. त्यासाठी तेजला पाडवी, मानसिंग पाडवी, सायसिंग पाडवी, अमरसिंग पाडवी, वालसिंग पाडवी, राया पाडवी, कालूसिंग पाडवी, सियाराम पाडवी, रवी पाडवी, आपसिंग पाडवी, भंगा पाडवी यांच्यासह दोन्ही पाडय़ातील युवक व महिलांनी श्रमदान केले.
श्रमदानाद्वारे सात किलोमीटर पाईपलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:11 IST