शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

ग्राहक मंचात 12 वर्षात एक हजार खटल्यांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात वर्षभरापासून बँकांसह विविध खाजगी वित्तीय संस्था आणि इतर सेवा देणा:या कंपन्यांकडून आर्थिक लूट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात वर्षभरापासून बँकांसह विविध खाजगी वित्तीय संस्था आणि इतर सेवा देणा:या कंपन्यांकडून आर्थिक लूट केल्या जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आह़े या पाश्र्वभूमीवर ग्राहक तक्रार निवारण मंचातील न्यायिक स्थितीचा आढावा घेतला असता, गेल्या 12 वर्षात जिल्ह्यातील 1 हजार ग्राहकांना न्याय मिळाल्याचे स्पष्ट करण्यात येऊन ग्राहकांच्या सर्वाधिक तक्रारी ह्या बँकांसंदर्भातील असल्याची माहितीही देण्यात आली आह़े     जिल्हानिर्मितीनंतर 9 वर्षानंतर नंदुरबार येथे स्वतंत्र ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापना करण्यात आली होती़ न्यायालयाच्या अधिनस्थ असलेल्या या मंचात 2006 पासून 1 हजार 367 तक्रारी दाखल करण्यात झाल्या होत्या़ यातील 945 तक्रारी न्यायाधीशांनी सर्व साक्षी-पुरावे तपासून ग्राहकांच्या बाजूने कौल देत निकाली काढल्या होत्या़ तर उर्वरित 422 खटल्यांवर अद्यापही कारवाई सुरु आह़े दाखल झालेले आणि निकाली काढलेल्या केसेस यांची संख्य खूप मोठी नसली तरी जिल्ह्यात ग्राहकांमध्ये जागृती येऊन मंचार्पयत तक्रार देण्याचे धाडस वाढत असल्याचे समोर आले आह़े  विशेष म्हणजे मंचाने निकाली काढलेल्या 379  केसेसमध्ये दावेदाराला दाद न देणा:यावर पुन्हा कारवाई करुन ग्राहकांना न्याय मिळवून दिला आह़े 2014 नंतर डिजीटलयाङोशनमुळे आर्थिक फसवणूकीचे गुन्हे उघडकीस येत असताना मंचात आर्थिक फसवणूकीच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या़ यावर तातडीने निकाल दिले गेल्याने ग्राहकांचा वेळ वाचून त्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास दृढ झाल्याचे दिसून आले आह़े  तूर्तास ग्राहकमंचात 422 केसेसवर कामकाज सुरु असून दर दिवशी पाच ते सात तक्रारी अर्ज प्राप्त होत आहेत़ 2014 नंतर जनधन योजनेसह विविध योजना ह्या डीबीटीद्वारे लागू झाल्याने बँकांची ग्राहक संख्या ही तिपटीने वाढली़ नंदुरबार जिल्ह्यात 9 राष्ट्रीयकृत, 4 खाजगी आणि 6 शेडय़ूल्ड कोऑपरेटीव्ह बँकांचे एकूण 17 लाख 23 हजार 333 खातेदार अस्तित्त्वात आहेत़ त्यांच्याकडून दर दिवशी बँकींगचा वापर होत आह़े जिल्ह्यात एकूण 85 टक्के नागरिक हे बँकांचे खातेदार असल्याचे सांगण्यात आले आह़े एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील खातेदारांची फसगत होण्याचे प्रकारही वाढले असून यांतर्गत गेल्या 10 वर्षात बँकांविरोधातील 451 तक्रारी ह्या दाखल करण्यात आल्या होत्या़ यातील 406 तक्रारी निकाली काढण्यात ग्राहक मंचला यश आले होत़े तर उर्वरित 45 केसेस ह्या पेंडीग असल्याची माहिती आह़े बहुतांश केसेस ह्या आर्थिक तक्रारींच्या असल्याने ग्राहकांना तशी भरपाई देण्याचे आदेश मंचने दिले होत़े त्याखालोखाल गेल्या 12 वर्षात वैद्यकीय निष्काळजीपणाच्या 12 केसेस आल्या होत्या़ यात 11 निकाली काढल्या गेल्या तर 1 केस अद्याप सुरु आह़े इन्शुरन्स संबधी 165 पैकी 149 निकाली काढल्या असून 16 केसेसवर काम सुरु आह़े हौसिंग संदर्भातील 18 पैकी 17 केसेसचा निकाल लागला आह़े वीज कंपनीच्या विरोधातील 58 पैकी 44 केसेसमध्ये ग्राहकांना न्याय देण्यात आला आह़े ग्राहकांच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही आदेशांचे पालन न करणा:या 379 उत्पादक किंवा संबधित विभागांना कलम 27 अंतर्गत नोटीसा बजावण्यात आल्या होत्या़ नोटीशीनंतर 234 जणांवर कारवाई करण्यात येऊन दंडाची वसुली केली होती़ उर्वरित 145 जणांवर कारवाई सुरु आह़े  ग्राहकमंचाने दिलेल्या आदेशांचे पालन करणा:या 146 जणांवर कमल 25 अंतर्गत कारवाई करण्यात आली होती़ कलम 25 नुसार कारवाई करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना आहेत़  यातील 146 पैकी 81 केसेस निकाली निघाल्या असून 65 जणांच्या अर्जावर सुनावणी सुरु आह़े यात दोषींच्या विरोधात निकाल लागल्यास महसूली नियमाप्रमाणे जप्तीचे आदेश काढण्यात येतात़ एखाद्या ग्राहकाची फसवणूक करुन त्याला दाद न देणा:या उत्पादक किंवा अर्थ पुरवठा करणा:या संस्थेला 3 वर्षार्पयत कारावासाची शिक्षा होऊ शकत़े