लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे (लाल बावटा) नंदुरबार व धुळे जिल्हा अधिवेशन कॉ.सुभाष पाडवी नगर प्रकाशा, ता.शहादा येथे पार पडले. या अधिवेशनात जिल्हा कमिटीची नव्याने निवड करण्यात आली.संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या बनाबाई नाईक यांच्या हस्ते ङोंडावंदन झाले. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष शहीद भगतसिंग ट्रक चालक-मालक युनियनचे जिल्हाध्यक्ष खंडू सामुद्रे होते तर अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते कुमार शिराळकर यांनी केले. कामगार संघटनेच्या वतीने एल.आर. राव, किसान सभेतर्फे जयसिंग माळी व युवा संघटनेतर्फे जिल्हा सचिव सुदाम ठाकरे यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. अधिवेशनात अध्यक्ष मंडळ म्हणून सुनील गायकवाड, रुबाबसिंग ठाकरे, इंदिराबाई चव्हाण, सनू नाईक यांनी काम पाहिले. जिल्हा सचिव मंगलसिंग चव्हाण यांनी मागील तीन वर्षाचा अहवाल मांडला. अहवालावर चर्चा करतांना सहा कॉम्रेड सहभागी झाले व अहवाल एकमताने पारीत करण्यात आला. तसेच नवीन जिल्हा कमिटी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष हिराबाई पवार, सचिव सुभाष ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. अधिवेशनाचा समारोप युनियनचे राज्य अध्यक्ष मारोती खंदारे यांनी केला तर आभार नथ्थू साळवे यांनी मानले.
शेतमजूर युनियनचे प्रकाशा येथे अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:26 IST