शहरातील माळीवाडा परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शेतमजुरांना टोपी-रुमाल व गुलाबपुष्प तर ज्येष्ठ महिलांना रुमाल व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी भीमराव देवरे, तर प्रमुख अतिथी म्हणून पालिकेचे माजी आरोग्य सभापती मोहन माळी उपस्थित होते. प्रास्ताविकात भीमराव देवरे यांनी सांगितले की, आपण आपल्या परिवारातील व परिसरातील ज्येष्ठांचा सन्मान करू, त्यांना मान देऊ तरच इतर आपल्या ज्येष्ठांना सन्मान देतील व आपली संस्कृतीही टिकून राहील, असे सांगितले. सूत्रसंचालन रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी, तर आभार सचिव अनिल शर्मा यांनी मानले. यावेळी गंगाराम रामजी माळी, मधुकर तुळशीराम माळी, दंगल लखा माळी, हिलाल ननका माळी, तुमडू आसाराम माळी, छगनलाल सखाराम बाविस्कर, सखाराम रामदास पाडवी, गोरख रामचंद्र माळी, रघुनाथ देवराम माळी, झगा देवराम माळी, मोरसिंग रेखा राठोड, श्रीराम चिंधू माळी, नथ्थू चिंधू मराठे आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब नंदनगरीतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST