कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी यांनी नॅकचे महत्त्व सांगून कोविड १९ या महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असताना उपयुक्त ठरलेल्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून महाविद्यालयांना गुणवत्ता सुधार होणेसाठी नॅक विषयावर वेबिनार आयोजित केल्याचे नमूद केले. या कार्यक्रमात ॲकडमिया कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत बोरकर यांनी नॅकसाठी डेटा तयार करताना तंत्रज्ञानाच्या वापर कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता समिती कक्षाचे समन्वयक डॉ.एस.एस. हासानी यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचालन मास्टरसॉफ्ट सेल्स विभागाचे उपाध्यक्ष मुस्ताक अहमद यांनी केले. कार्यक्रमात भारतातील अनेक राज्यांमधून विविध महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता समितीच्या २०० हून अधिक समन्वयकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, उपाध्यक्ष ॲड.राजेंद्र रघुवंशी तसेच संचालक मंडळाने प्रोत्साहन दिले. प्राचार्य, डॉ.एन.डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन डॉ.एस.एस. हासानी यांनी केले.
विधी महाविद्यालयात नॅक विषयावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST