शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा काढण्यासाठी होतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:32 IST

नंदुरबार : शासनाने आॅनलाईन सातबाराची सक्ती केली असली तरी हे सातबारे काढण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वांनाच कसरत करावी लागत आहे़ महिन्याभरापासून ...

नंदुरबार : शासनाने आॅनलाईन सातबाराची सक्ती केली असली तरी हे सातबारे काढण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वांनाच कसरत करावी लागत आहे़ महिन्याभरापासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे तलाठी कार्यालयांच्या कामकाजावर सर्वाधिक परिणाम झाला असून जिल्ह्यातील ३६ मंडळात सातबारा मिळण्याची गती मंदावली आहे़जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालयांमधून सातबारा, नमुना आठ अ, जुने फेरफार आणि जन्म मृत्यूच्या नोंदीचे दाखले आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ महाभूमी या संकेतस्थळावर जिल्ह्याचे २७ लाख ८९ हजार ६०१ दाखले उपलब्ध आहेत़ यात २२ लाख २७ हजार ४१४ सातबारे, १ लाख ६९ हजार ६३८ आठ अ, तीन लाख २० हजार २७९ जुन्यानोंदी आॅनलाईन आहेत़ एवढ्या मोठ्या प्रमाणात दस्तावेज आॅनलाईन झाल्याने कामकाजही वाढले होते़ २०१७ पासून जिल्ह्यात सुरळीतपणे आॅनलाईन दाखल्यांचे वितरण सुरु आहे़ शेतकरी व मालमत्ताधारकांच्या सातबारांचे आॅनलाईन संकलन झाल्याने एका क्लिकवर दाखला उपलब्ध होत होता़ परंतू गत महिन्याभरापासून यात बदल झाला असून सातबारा मिळवण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे़ तलाठींकडून हाताने तयार केलेल्या सातबाराची प्रत मिळणे बंद झाले असल्याने आॅनलाईन सातबारा मिळवण्यासाठी त्या-त्या परिसरातील महा-ई-सेवा केंद्रांमध्ये गर्दी वाढत आहे़महिनाभर हा प्रकार सुरु राहणार असल्याची माहिती असून जिल्ह्यासह राज्यातील ३५ जिल्ह्यातील सातबारे स्टेट डेटा सेंटरमधून राज्यशासनाने नियुक्त केलेल्या खाजगी कंपनीच्या सर्व्हरवर टाकण्याचे काम सुरु आहे़ गेल्या महिनाभरात केवळ १० जिल्ह्यांचे कामच पूर्ण होऊ शकल्याची माहिती असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये येत्या महिनाभरात डेटा शिफ्टींगचे काम पूर्ण होणार आहे़ भूमिअभिलेख संकेतस्थळावर नंदुरबार तालुक्यातील ६ लाख ७५ हजार ३६६ सातबारे, ३८ हजार ९५२ नमुना अ, १ लाख ७४ जुने फेरफार नोंदी, १५ हजार ९२५ जन्म मृत्यूच्या नोंदी असे एकूण आठ लाख ३० हजार ३१७ दाखले आॅनलाईन स्वरुपात उपलब्ध आहेत़नवापूर तालुक्यातील तीन लाख ४२ हजार २४१ सातबारे, २४ हजार ६५८ नमुना आठ अ, ३५ हजार ५१६ जुने फेरफार नोंदी, तीन हजार ३०४, जन्म मृत्यू नोंदी असे चार लाख पाच हजार ७१९ दाखले आॅनलाईन झाले आहेत़शहादा तालुक्यातील सहा लाख ९८ हजार ५७ सातबारे, ५७ हजार ५४३ नमुना आठ अ, जुने फेरफार नोंदी १ लाख १३ हजार ८, जन्म मृत्यूच्या नोंदी ३८ हजार १६० असे एकूण ८ लाख १८ हजार ५६८ दाखले आॅनलाईन आहेत़धडगाव तालुक्यातील एक लाख ४४ हजार ४६१ सातबारे, १३ हजार २५४ आठ अ, नमुना आठ हजार ७२० जुने फेरफार नोंदी, दोन हजार ३८० जन्म मृत्यूच्या नोंदी, अशा एकूण एक लाख ६८ हजार ८१५ दाखले़तळोदा तालुक्यात १ लाख ९७ हजार ९६९ सातबारा, ११ हजार ४३४ नमुना आठ अ, ३९ हजार ८१६ जुने फेरफार नोंदी, ६ हजार २६० जन्म-मृत्यू नोंदी असे दोन लाख ५५ हजार ४६९ दाखले़अक्कलकुवा तालुक्यात २ लाख ५७ हजार ५३० सातबारा, २३ हजार ७९७ नमुना आठ अ, २३ हजार १४५ जुने फेरफार नोंदी, ६ हजार २४१ जन्म मृत्यूच्या नोंदी आॅनलाईन आहेत़ ह्या नोंदी निघत नसल्याने त्या-त्या तालुक्यातील शेतकरी हैैराण झाले आहेत़