शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन पोस्ट बँक जागेच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 13:17 IST

केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेची स्थिती : नंदुरबारात जागा नसल्याने नवापूरात शाखा

नंदुरबार : शंभरटक्के केंद्राचा वाटा असलेली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना ‘इंडियन पोस्ट बँक’ला नंदुरबार शहरात जागा उपलब्ध होत नसल्याची स्थिती आह़े त्यामुळे जिल्ह्याचे ठिकाण सोडून नाईलाजास्तव बँकेची मुख्य शाखा नवापूर येथे सुरु करण्यात आली  आह़ेसाधारणत: 2 सप्टेंबर 2018 रोजी नंदुरबारात इंडियन पोस्ट बँक योजनीची सुरुवात करण्यात आली़ परंतु शहरात पोस्ट बँकेसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने नवापूर येथे पोस्ट कार्यालयाच्या मालकीच्या जागेवर या योजनेच्या मुख्य शाखेचे उद्घाटन करण्यात आले आह़े गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार येथील पोस्ट कार्यालयदेखील एका भाडय़ाच्या इमारतीत सुरु असल्याचे सांगण्यात आले आह़े याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन इंडियन पोस्ट बँकेसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरु लागली आह़े ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांचा वर्षानुवर्षे विश्वास लाभलेल्या पोस्ट खात्यातच इडियन पोस्ट बँकेची स्थापना करावी़ तसेच बँकेचे जाळे ग्रामीण तसेच दुर्गम भागात अद्याप पोहचलेले नसल्याने इंडियन पोस्ट बँकेव्दारे गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणुकीचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आह़े संपूर्ण भारतभरातील पोस्ट कार्यालयातच एक स्वतंत्र पोस्ट बँक तयार करण्यात आली आह़े याव्दारे गुंतवणूकदारांना बचत तसेच चालू खाते उघडता येणार आह़ेसंपूर्ण पेपरलेस व्यवहारइंडियन पोस्ट बँकचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय़ म्हणजे याव्दारे चालणारे सर्व व्यवहार हे पेपरलेस असणार आहेत़ या बँकेत खाते उघडण्यासाठी गुंतवणूकदारांला कुठलेही कागदपत्र देण्याची गरज राहणार नाही़ केवळ आधार कार्ड व पॅन कार्ड नंबर सांगून बायोमॅट्रीक थमव्दारे बँकेत आपले खाते उघडणार आह़े आधार व पॅन सोबतच संबंधित व्यक्तीने आपला मोबाईल क्रमांक दिल्यास त्यावर एक ओटीपी क्रमांक येईल़ तो ओटीपी नंबर सांगितल्यावर त्याव्दारे बँक खाते उघडण्याची कार्यवाही करण्यात येणार आह़े बायोमॅट्रीक थम असल्याने व्यवहारात पारदर्शकता निर्माण होऊन विविध घोटाळ्यांनाही आळा बसणार आह़े ई-केवायसीव्दारे बँक खाते उघडण्यात येणार आह़े पोस्टमन्स्ना मिळणार प्रशिक्षणप्रत्येक पोस्टमन्स्ना या योजनेंतर्गत एक डिव्हाईस देण्यात येणार आह़े त्याव्दारे दुर्गम भागात टपाल वाटप तसेच विविध कामांसाठी जाणा:या पोस्टमन्स्व्दारेही बँक खाते उघडण्यास मदत होणार आह़े या डिव्हाईसवर बायोमॅट्रीक थम करुन तसेच आवश्यक ती सर्व पूर्तता झाल्यावर घरबसल्या इंडियन पोस्ट बँकेत खाते उघडण्याची सोय उपलब्ध होणार आह़े याबाबत इंडियन पोस्ट बँकेतील कर्मचा:यांना धुळे येथे प्रशिक्षणही देण्यात आले आह़े जिल्हाभरात पोस्टाच्या सुमारे 200 शाखा डाकघर आहेत़ त्या सर्व ठिकाणी लवकरच इंडियन पोस्ट बँकेचा विस्तार  करण्यात येणार आह़े सुमारे चार महिन्यात जिल्हाभरातील सर्व शाखा डाकघरांमध्येही या योजनेंतर्गत पोस्ट बँक सुरु करण्यात येणार आह़े योजनेबाबत जनजागृती होत असून जिल्ह्यातील प्रत्येक शाखांमध्ये योजनेची फलके लावण्यात आलेली आह़े आपली बँक आपल्या दारी हे या योजनेचे ब्रीदवाक्य असून त्यानुसार दुर्गम भागातही आता घरबसल्या बँक खाते उघडणे शक्य होणार आह़े