शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पायपीट करुन गाठावी लागते शाळा : छोटाधनपूर ते बोरद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:06 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार : तळोदा तालुक्यातील छोटाधनपूर ते बोरद दरम्यान एसटी बसेसच्या फे:या होत नसल्याने गावातील तब्बल 167 विद्याथ्र्याना दररोज पायपीट करुन शाळा गाठावी लागत असल्याची स्थिती आह़े या मार्गावर त्वरीत बसफे:या सुरु कराव्या अशी मागणी करण्यात येत आह़ेछोटाधनपूर येथून 90 विद्यार्थिनी तर 77 विद्यार्थी दररोज बोरद येथील माध्यमिक शाळेत जात ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार : तळोदा तालुक्यातील छोटाधनपूर ते बोरद दरम्यान एसटी बसेसच्या फे:या होत नसल्याने गावातील तब्बल 167 विद्याथ्र्याना दररोज पायपीट करुन शाळा गाठावी लागत असल्याची स्थिती आह़े या मार्गावर त्वरीत बसफे:या सुरु कराव्या अशी मागणी करण्यात येत आह़ेछोटाधनपूर येथून 90 विद्यार्थिनी तर 77 विद्यार्थी दररोज बोरद येथील माध्यमिक शाळेत जात असतात़ परंतु रस्त्याच्या दुरावस्थेचे कारण पुढे करुन अक्कलकुवा आगाराकडून एसटी बससेवा बंद करण्यात आल्याने आता या विद्याथ्र्याना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आह़े त्यामुळे विद्याथ्र्यासह पालकांकडूनही आता नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा ते छोटाधनपूर र्पयत एसटी बस जात असून धनपूर ते बोरद या मार्गावर बसफे:या बंद आहेत़ त्यामुळे परिणामी विद्याथ्र्यासमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत़ याचा परिणाम विद्याथ्र्याच्या शैक्षणिक जीवनावरही होत असल्याचे सांगण्यात येत आह़ेत्यामुळे अक्कलकुवा आगाराकडून त्वरीत या मार्गावर फे:या सुरु करण्यात याव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून आता जोर धरु लागली आह़ेछोटा धनपूर या गावाची लोकसंख्या साधारणत 2 हजार 900 इतकी आह़े त्यामुळे साहजिकच या गावात दळणवळण व्यवस्थेला अत्यंत महत्व आह़े या गावातील विद्यार्थी सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात शाळेत जात असतात़ सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आह़े त्यामुळे दुपारच्या सत्रात शाळेत जाणा:या विद्याथ्र्याना उन्हामध्येच पायपीट करीत शाळा गाठावी लागत असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आह़े धनपूर गाव हे संपूर्णपणे आदिवासी लोकवस्तीचे गाव आह़े त्यामुळे येथील विद्याथ्र्याना शिक्षणाच्या मुळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाकडून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असतात़ परंतु विद्याथ्र्याना शाळेत जाण्यासाठी अशी पायपीट करावी लागत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आह़े शाळेत जाण्यासाठी सोयीसुविधा नसल्याने अनेक आदिवासी विद्याथ्र्याना शिक्षणापासून वंचित रहावे लागत असत़ेएकीकडे मराठी शाळा टिकवण्यासाठी शासनाकडून नवनवीन योजना, उपक्रम हाती घेण्यात येत असताना दुसरीकडे दळणवळण सुविधेअभावी विद्याथ्र्याना वंचित रहावे लागत आह़ेदरम्यान, अक्कलकुवा एसटी आगाराकडून खड्डे असल्याचे कारण पुढे करीत बसफे:या बंद करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आह़ेत्याच प्रमाणे रस्त्याच्या दुतर्फाही काटेरी झुडपे असल्याने एसटीच्या चालकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े त्यामुळे एसटी महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी समन्वय साधत कामे केल्यास विद्याथ्र्याचे होत असलेले शैक्षणिक नुकसान थांबू शकते अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े