कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागात मोबाईलची रेंज नसणे, ॲन्ड्राईड मोबाईल नसणे आदी कारणांमुळे बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. यासाठी शहादा येथील शारदा कन्या विद्यालयातर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील व ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींसाठी गृहभेटीचे नियोजन करण्यात येते. विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका गटागटाने विद्यार्थिनींच्या गृहभेटीसाठी जात असून घरी जाऊन अध्ययन अध्यापन केले जात आहे. विद्यार्थिनींना गृहपाठ स्वाध्याय देण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व विषयांचा अभ्यास घेण्यात येत आहे. पालकांशी विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसंबंधी चर्चा व मार्गदर्शनही केले जात आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थिनी व पालकांचा शिक्षकांना प्रतिसाद मिळत आहे. मुख्याध्यापिका एस.झेड. सैयद व पर्यवेक्षक एन.बी. कोते या कामी शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहेत.
शाळा बंद, पण शिक्षण सुरू उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:32 IST