शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नंदुरबार दौरा : झाडाझडतीसह चौकशीचेही आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज जिल्ह्यातील आदिवासी उपयोजनेअंतर्गत विविध कामांची पहाणी केली. काही ठिकाणी समितीला त्रुटी आढळून आल्याने त्या मुदतीत दूर कराव्या अशा सुचनाही देण्यात आल्या. समितीच्या 12 सदस्यांनी तीन विभाग वाटून घेतल्याने दिवसभरात जवळपास 42 ठिकाणी या समितीने भेटी दिल्या. त्यामुळे जिल्हाभरात शुक्रवारी समितीच्या भेटींचीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज जिल्ह्यातील आदिवासी उपयोजनेअंतर्गत विविध कामांची पहाणी केली. काही ठिकाणी समितीला त्रुटी आढळून आल्याने त्या मुदतीत दूर कराव्या अशा सुचनाही देण्यात आल्या. समितीच्या 12 सदस्यांनी तीन विभाग वाटून घेतल्याने दिवसभरात जवळपास 42 ठिकाणी या समितीने भेटी दिल्या. त्यामुळे जिल्हाभरात शुक्रवारी समितीच्या भेटींचीच चर्चा होती.समिती गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाली होती. सकाळी पाच आमदार येथे पोहचले होते. सायंकाळी उशीरा सात आमदार पुन्हा दाखल झाले. काही आमदार नंदुरबारात मुक्कामाला होते तर काहींनी थेट धडगाव गाठले. शुक्रवारी समितीतील सदस्य आमदारांनी गट अर्थात उपसमिती तयार केल्या. पहिल्या उपसमितीत समिती प्रमुख म्हणून आमदार श्रीकांत देशपांडे तर सदस्य म्हणून आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा, आमदार संजय कांबळे यांचा समावेश होता. या उपसमितीने नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कामांना भेटी दिल्या. दुस:या उपसमितीचे प्रमुख आमदार अशोक उईके होते. सदस्य म्हणून आमदार संतोष टारफे, आमदार पास्कर धनारे, आमदार प्रभुदत्त भिलावेकर व आमदार राजेश तारवी यांचा समावेश होता. या समितीने तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील कामांना भेटी दिल्या. तिस:या उपसमितीचे प्रमुख आमदार वैभव पिचड होते. सदस्य म्हणून आमदार पांडुरंग वरोरा, आमदार आनंद ठाकुर यांचा समावेश होता. या समितीने शहादा व धडगाव तालुक्यातील कामांना भेटी दिल्या.अनेक ठिकाणी अनियमितता आढळल्याने झाडाझडतीही झाली. चौकशीचेही आदेश देण्यात आले.