शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात ‘ई-पॉस’चा तुटवडा

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: June 8, 2018 12:58 IST

अनुदानित खत वितरण : कनेक्टीव्हीटीसाठी यंदा प्रथमच ‘हाय रेंज अॅन्टेना’

ठळक मुद्दे केवळ 23 हजार ‘ई-पॉस’ मशिन उपलब्ध अनुदानित खतांची वितरण हाय रेंज अॅन्टीने पॉस मशिन विक्री

संतोष सूर्यवंशी । नंदुरबार : शासनाच्या नवीन धोरणानुसार अनुदानित खतांचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘ई-पॉस’ मशिनचा संपूर्ण राज्यभरात तुटवडा निर्माण झाला आह़े त्यातच दुर्गम भागात ‘नेट कनेक्टीव्हीटी’ नसल्याने यंदाच्या खरिप हंगामात खतांचे वितरण करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आह़ेराज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार सर्व अनुदानित खतांचे वितरण करण्यासाठी ‘ई-पॉस’ मशिनचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आह़े त्यानुसार अनुदानित खतांची वितरण करणा:या कृषि केंद्रांकडे ‘ई-पॉस’ मशिन असणे अनिवार्य करण्यात आले आह़े संपूर्ण राज्याचा विचार करता राज्यभरात साधारणत 30 कृषि केंद्रे आहेत़ त्यांच्या माध्यमातून अनुदानित खतांचे वितरण करण्यात येणार आह़े परंतु त्या तुलनेत केवळ 23 हजार ‘ई-पॉस’ मशिन उपलब्ध आहेत़ त्यामुळे अजून किमान सहा ते सात हजार ‘ई-पॉस’ मशिनचा पुरवठा होणे गरजेचा आह़े मागील वर्षापासून अनुदानित खतांचे वितरण ‘ई-पॉस’ मशिनच्या माध्यमातून करण्यात यावे असे नवीन धोरण शासनाकडून ठरविण्यात आले आह़े या वितरण प्रणालीमुळे खतांच्या विक्रीमध्ये होणारा काळाबाजार थांबण्यास मदत होणार असल्याने हा उत्तम निर्णय मानला जात आह़े परंतु ‘ई-पॉस’ मशिनला निर्माण होणा:या तांत्रिक अडचणी बघता यावर प्रशासनाकडून ‘मायक्रो स्टडी’ होणे गरजेचे आह़े मागच्या वर्षीचा अनुभव बघता अनेक ‘ई-पॉस’ मशिनला तांत्रिक अडचणींमुळे त्या निरुपयोगी ठरल्या होत्या़ त्यामुळे ऐनवेळी मशिन बंद पडल्यास प्रशासनाकडून कुठली पर्यायी व्यवस्था करण्यात येईल काय? असा प्रश्न यानिमित्ताने  निर्माण होत आह़े जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामासाठी 94 हजार 90 मेट्रीक टन इतके खतांचे आवंटन झालेले आह़े तसेच 1 लाख 88 हजार खातेधारक शेतकरी आहेत़ सर्वत्र खरिप हंगामाची लगबग दिसून येत आह़े नंदुरबारसारख्या दुर्गम भागात ‘ई-पॉस’ मशिनचा वापर करुन खतांची विक्री करणे ‘कनेक्टीव्हीटी’ अभावी कठीण होत आह़े ‘ई-पॉस’ मशिनमुळे खतांचा काळा बाजार थांबण्यास मदत होणार असली तरी, यातील तांत्रिक अडथळे त्वरीत दुर व्हावेत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आह़ेनंदुरबार, गडचिरोली, पालघर, गोंदीया, भंडारा आदी दुर्गम भागांमध्ये अनेक वेळा ई-पॉस मशिनला कनेक्टीव्हीटी मिळत नाही़ त्यामुळे मागील वर्षीसुध्दा खतांच्या विक्रीला मोठी अडचण निर्माण झाली होती़ त्यामुळे यंदा शासनाकडून ई-पॉस् मशिनची विक्री करण्या:या कंपन्यांमार्फत हाय रेंज अॅन्टीनाची उपलब्धता करुन देण्यात येईल़पॉस मशिनसोबतच एक अॅन्टीना देण्यात येत असतो़ परंतु अती दुर्गम भागात त्याला कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात़ त्यामुळे शासनाकडून हाय रेंजचे अॅन्टीन्यांचा प्रथमच प्रयोग करण्यात येत आह़ेकृषि केंद्र चालकांना संबंधित हाय रेंज अॅन्टीने पॉस मशिन विक्री करणा:या कंपनीकडून उपलब्ध करुन घ्यावे लागणार आहेत़ सध्या 2.46 व्हजर्न असलेल्या ई-पॉस मशिन कंपन्यांकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आह़े राज्यात कृभको, व्हीजन टेक, आरपीएफ आदी 20 कंपन्यांकडून राज्यभरात  ई-पॉस मशिनचा पुरवठा करण्यात येत आह़े दरम्यान, वाय-फाय, जीपीआरएस, ब्रॉडबॅण्ड आदीं इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून ई पॉस मशिनचा वापर करण्यात येणार आह़ेजिल्हानिहाय उपलब्ध ई-पॉस मशिन जळगाव 1 हजार 165, धुळे 499, नंदुरबार 160, अहमदनगर 1 हजार 278, अकोला 431, अमरावती 1 हजार 2, औरंगाबाद 1 हजार 99, बीड 1 हजार 124, भंडारा 539, बुलढाणा 741, चंद्रपुर 644, गडचिरोली 314, गोंदिया 551, हिंगोली 381, जालना 631, कोल्हापूर 1357, लातूर 588, नागपूर 925, नांदेड 906, उत्सामानाबाद 437, पालघर 172, परभणी 442, पुणे 989, रत्नागिरी 295, सांगली 948, सातारा 877, सिंधुदूर्ग 182, सोलापूर 984, ठाणे 125, वर्धा 575, वाशिम 317, यवतमाळ 1 हजार 116, नाशिक 1367, रायगड 242