नंदुरबार : दिल्ली येथील किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान ठिकठिकाणी उपोषण, निदर्शने करण्यात येत आहेत. नवापूरपासून त्याला सुरुवात करण्यात आली.
शेतकरीविरोधी तीन कायदे मागे घ्यावे, यासह इतर मागण्यांसाठी किसान आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा म्हणून सत्यशोधक सभेेनेदेखील जिल्ह्यात तसेच धुळे जिल्ह्यात आंदोलनाचे नियोजन केले आहे. ३० जानेवारी रोजी नवापूर येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. १ फेब्रुवारी रोजी धुळे व पिंपळनेर येथे, २ फेब्रुवारी रोजी नंदुरबार आणि जैताण, ता. साक्री येथे, ३ फेब्रुवारी रोजी खांडबारा, ता. नवापूर व ४ फेब्रुवारी रोजी साक्री येथे हे आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनांमध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन सत्यशोधकतर्फे करण्यात आले आहे.