शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

सारंगखेड्यात कलाकारांनी केली विनोदाची धम्माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : चेतक फेस्टिवलची रंगत दिवसेंदिवस वाढत असून, चेतकच्या मंचवर प्रसिद्ध मराठी टी.व्ही. शो कॉमेडीची धम्माल ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : चेतक फेस्टिवलची रंगत दिवसेंदिवस वाढत असून, चेतकच्या मंचवर प्रसिद्ध मराठी टी.व्ही. शो कॉमेडीची धम्माल बुलेट ट्रेन फेम योगेश सुपेकर, चेतना चावडा, देवयानी मोरे, प्राची शबनमसह अनेक सेलिब्रिटींनी विनोदाच्या माध्यमातून हास्य कल्लोळ माजवून प्रेक्षकांना लोटपोट केले.बी. मोहन प्रस्तुत कॉमेडी शो या कार्यक्रमाचे मंगळवारी रात्री सादरीकरण झाले. यात उपस्थित कलाकारांनी प्रेक्षक रसिकांना हसवून लोटपोट केले. या कलाकारांनी दत्त महाराजांचे दर्शन घेत घोडे बाजारात फेरफटका मारत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. या विनोदी कार्यक्रमास प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. तसेच लावणीसह मराठी गीतांवर नृत्यांगणांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले.गुरूवारपासून अश्व स्पर्धांना प्रारंभ होत असून, सलग चार दिवस स्पर्धा होणार आहे. यात मारवारी, काठेवाडी, नुकरा या तीन जातीच्या घोड्यांच्या स्पर्धांना सुरूवात होणार आहे. अत्यंत महागडे घोडे या स्पर्धेसाठी दाखल झाले असून, यात राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब व महाराष्टÑातील अश्वांचा समावेश आहे. या घोड्यांच्या किमती करोडो रूपयांच्या घरात असतात, असे चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसंह रावल यांनी सांगितले. या स्पर्धेत लाखो रूपयांची पारितोषिके घोड्यांना दिली जातात.स्पर्धेचे नियोजन दरवर्षी करण्यात येते. याचे नियोजन विवेक वाडिले, अजय पाटील, महेंद्र गिरासे, विनोद तावडे, संदीप जमादार, एकनाथ गिरासे करतात.घोड्यांचे नृत्य पाहण्यासाठी गर्दीघोडे बाजारात रात्रीही घोड्यांचे नृत्य पाहण्यासाठी अश्व शौकीनांची गर्दी चेतक प्रांगणावर दिसून येत आहे. घोडे बाजारातदेखील उलाढालीत चैतन्य निमाण झाले आहे. बुधवारी ६८ घोड्यांची विक्री झाली. यातून ३१ लाख ४८ हजारांची उलाढाल झाली आहे. यात्रेच्या आठव्या दिवशी दोन कोटी २४ लाख चार हजार ९०० रुपयांची उलाढाल झाली. जास्तीत जास्त पाच लाख ५१ हजार रूपयांच्या घोडीची मंगळवारी विक्री झाली. ती मध्यप्रदेशातील शुभमसिंह तवरसिंह राजपूत या व्यापाऱ्याने विक्रीसाठी आणली होती. तर ती नितेश प्रेमसिंग राजपूत रा.वरखेडी खुर्द, सोयगाव, ता.जि.औरंगाबाद या अश्वप्रेमीने विकत घेतली.२० रोजी सारंगश्री २०१९चेतक फेस्टिवल समितीतर्फे २० डिसेंबर रोजी सारंगश्री २०१९ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० किलो वजन गटात उत्तर विभागीय बॉडी बिल्डींग स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा चेतक महोत्सव समिती सारंगखेडा व उत्तर विभागीय बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी नामवंत बिल्डर्स हजेरी लावतात व स्पर्धेत सहभागी होतात. विजयी स्पर्धकांना जीम बॅग, शेकर टी शर्ट, एनर्जी ड्रिंक, प्रमाणपत्र, शिल्ड देऊन गौरविण्यात येईल. अनिल गोरे, मनोज गायकवाड, नीलेश चौधरी, आशुतोष पाटील हे कार्यक्रमाचे संयोजन करतील.घोड्यांचे शृंगार साहित्य विक्रेतेया यात्रोत्सवात घोडे बाजाराबरोबरच घोड्यांना लागणारे शाल, छत्री, खोगीर, दोर, बग्गी, घुंगरू, पट्टे यासह विविध साजची १०० पेक्षा अधिक दुकाने थाटली आहेत. या वेळी मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्टÑ, दिल्ली येथील साज शृंगार घेऊन व्यापारी येतात. घोडा खरेदी केल्यानंतर अश्व शौकीनांची पाऊले या बाजाराकडे वळतात. या वेळी साज विक्रीच्या माध्यमातून बाजारात करोडो रूपयांची उलाढाल होत असते.जुन्नर ते सारंगखेडा ३२५ कि.मी.ची घोडदौड४जुन्नर ते सारंगखेडा ३२५ किलोमीटर घोडदौड करून अमित खत्री हा तरूण १६ डिसेंबरपासून आपल्या अश्वावर स्वार होऊन प्रवासाला निघाला. पहिल्या दिवसी ६० किलोमीटर प्रवार तर दुसºया दिवशी धांदरकळ, संगमनेर मार्गे-मालदाड, नानज दुकानाला, चिंचोली, देवकोठे, माळढोग, किोलवेवाडी ७० किलोमीटर तर तिसºया दिवशी १३० किलोमीटरचा टप्पा पार करून २१ डिसेंबर रोजी सारंगखेडा चेतक फेस्टीवलमध्ये त्याचे स्वागत चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल करणार आहेत. त्याने ग्रामदेवताचे आशिर्वाद घेत प्रवासाला सुरूवात केली होती व घरच्यांचा व ग्रमास्थांचा आशिर्वाद प्रवासाला सुरूवात केली आहे. गेल्यावर्षी अकोला येथून राजवीर नागरा हा ११ वर्षीय घोडेस्वार व अश्वप्रेमींनी अकोला ते सारंगखेडा असा ३५० किलोमीटरचा प्रवास घोड्यावरून केला होता.राजस्थानीकाठीला मागणी४गेल्या १० ते १२ वर्षांपासून इंदोर येथील प्रसिद्ध पदम्नाथ काठीवाले हे आपल्या १० ते १२ सहकाऱ्यांसह सारंगखेडा चेतक फेस्टिवला येतात. सारंगखेडा यात्रेत त्यांचा मोठा व्यवसाय होतो. यात्रेत ते १०० ते २०० रूपये किमतीच्या रंगीबेरंगी राजस्थानी काठ्या विक्रीसाठी आणल्या आहेत. यात्रेत येणाºया भाविक व पर्यटकांना काठ्या भुरळ घालत आहेत. १०० मधून किमान १० ते २० यात्रेकरूंच्या हातात या राजस्थानी काठ्या दिसतात. अगदी रोजच्या व चेतक फेस्टिवलच्या भव्य दिव्य अशा गड किल्ल्यांच्या प्रतिकृतीत असणाºया प्रवेशद्वारासमोर या हे स्टॉल थाटले आहे. यात्रेकरूंचे आकर्षण राजस्थानी काठ्या बनू पहात आहेत.