शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

सारंगखेडा गाव तीन दिवस पूर्ण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील मालेगाव रिटर्न झालेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील मालेगाव रिटर्न झालेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्याशी संपर्कात असलेले कर्मचारी, अधिकारी व निकटवर्ती अशा १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस ग्रामपंचायतीने गावातील अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने वगळता गाव पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन पशुसंवर्धन दवाखाना, कर्मचारी निवासस्थान व परिसर सील करण्यात आला आहे.सारंगखेडा येथील पशूवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी हे मालेगाव येथील रहिवासी असून ते येथे कार्यरत आहेत. ते सध्या मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून सारंगखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला सील करण्यात आले आहे. पशुधन विकास अधिकारी हे २९ मे रोजी सकाळी आपले कर्तव्य बजावण्यासाठी सारंगखेडा येथील दवाखान्यात दीड तास थांबल्यानंतर सहायक पशूधन विकास अधिकारी व परिचर या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले. नंतर त्यांच्या शहादा येथील रूमवर मुक्कामी राहिले. तेथे त्यांचे रूम पार्टनर वैजाली येथील पशुधन विकास अधिकारी त्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. रात्री त्यांना मालेगाव येथून कटुंबीयांनी भ्रमणध्वनीवर तुमचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समजले. मुलीची तब्येत खराब झाली असल्याचे सांगून संबंधित पशूधन विकास अधिकारी ३० मे रोजी सकाळीच आपल्या मोटरसायकलने मालेगावकडे निघाले. त्यानंतर आरोग्य विभागाकडून त्यांच्या संपर्कातील १० लोकांना मोहिदा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जण स्वत:हून त्याआधी क्वारंटाईन कक्षात दाखल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच सुशीलाबाई मोरे, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, ग्रामसेवक मडळे आदींनी पशुवैद्यकीय दवाखाना व कर्मचारी निवासस्थाने सील करून पाहणी केली.सारंगखेडा येथील पशुसंवर्धन दवाखाना, कर्मचारी निवासस्थान सील करण्यात येऊन त्याचा परिसरही काटेरी झुडपे टाकून बंद करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीकडून पशुसंवर्धन दवाखाना परिसरासह संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाकडून ३ ते ५ मे दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता गाव पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, केशकर्तनालय पुढील आदेश येईपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच सुशिलाबाई मोरे यांनी केले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, ग्रामविकास अधिकारी मंडळे, ग्रामविस्तार अधिकारी सूर्यवंशी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.सारंगखेडा, ता.शहादा येथील पशूवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाºयाचा प्राथमिक तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याची प्राथमिक माहिती सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन यांना देणे अनिवार्य होते. परंतु तसे न करता त्यांच्या संपर्कात असलेल्या १० व्यक्तींना क्वारंटाईन करून मोहिदा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. काही लोक स्वत:हून दाखल झाले तर काहींना रात्री उशिरा क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्यात कोणतीच लक्षणे आढळून येत नसल्याने दोन-तीन दिवसात त्यांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी दिली.