प्रथम वर्षाचा निकाल १०० टक्के, तर अंतिम वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असून, त्यात महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रथम मृणालिनी मोहन बोंडे (९५ टक्के), द्वितीय मंसुरी असरा फरीद (८६.७३), तृतीय सुधा छोटूलाल पटेल (८६.६४) गुण मिळवून उत्तीर्ण झाली. अंतिम वर्षात प्रथम जयश्री योगेश चौधरी (९३.८० टक्के), द्वितीय हर्षला राजेंद्र बागल (९०.९०), तृतीय अनिरुद्ध दत्तात्रय सोनजे (८५.१०) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा. मकरंदभाई पाटील, अर्थ व बांधकाम विभागाचे समन्वयक पी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, डी. फार्मसी विभागप्रमुख प्रा. गिरीष बडगुजर, प्रा. राहुल लोव्हारे, प्रा. माधुरी पवार, प्रा. चेतन पटेल, प्रा. ज्योत्सना खेडकर व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.
साने गुरुजी औषधनिर्माण शास्त्राचा निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST