शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

सातपुडय़ातील आदर्श पुनवर्सनाचा नमुना ‘लक्कडकोट रोपवन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:55 IST

20 वर्षात वनक्षेत्र बहरले : नवापूर तालुक्यात वनविभाग व वनव्यवस्थापन समितीचा प्रयत्न

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील जंगल पाण्याखाली गेल्याने त्याचे पुनवर्सन कसे करावे, यावर विचार करत शासनाने नंदुरबार जिल्ह्यात रोपवनांची लागवड करून वनांचे पुनवर्सन केले होत़े गेल्या 20 वर्षात या वनांनी युवावस्थेत पदार्पण केले असून यातील लक्कडकोट रोपवन आदर्श पुनवर्सनाचा नमुना ठरत आह़े बुधवारी नर्मदा प्राधिकरण नदी विकास आणि गंगा पुर्नभरण जलस्त्रोत मंत्रालयाचे डॉ़ अफरोज अहमद यांनी लक्कडकोट येथे भेट देत वनव्यवस्थापन समितीच्या कार्याचा गौरव केला होता़ यावेळी त्यांनी वनविभागाच्या प्रय}ांचे कौतुक करून केंद्र सरकारकडून प्रकाशित होणा:या पुस्तीकेत लक्कटकोट रोपवनाचा समावेश करण्याची घोषणा केल्याने हे रोपवन प्रकाश झोतात आले होत़े गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर फुलवलेल्या या रोपवनात सहा लाखांपेक्षा अधिक झाडे असून गत 20 वर्षात या वनाचा विस्तार हा वाढत गेला आह़े एक परिपूर्ण वनक्षेत्र तयार होत असल्याने याठिकाणी बिबटय़ा आणि इतर वन्यप्राणीही या ठिकाणी आसरा घेत असल्याने वनविभागाने लावलेल्या कॅमे:यांमध्ये दिसून येऊ लागले आह़े या रोपवनातून औषधी वनस्पतीची निर्मिती व वनपर्यटनासाठी क्षेत्र खुले करण्याचा प्रस्ताव वनविभागाच्या विचाराधिन आह़े 60 हेक्टरवर झाडांचे संगोपन 1990 साली सरदार सरोवर पुनवर्सन विभागाने नवापूर तालुक्यातील लक्कडकोट येथे 60 हेक्टर जागा वनविभागाला देण्यात आली होती़ या जागेवर लक्कडकोट वनव्यवस्थान समिती आणि वनविभाग यांच्या संयु्क्त विद्यमाने दरवर्षी झाडांची लागवड करण्यात येत होती़ वर्षभर याठिकाणी झाडांची राखण करून चराईबंदी आणि कु:हाडबंदी करण्याचा निर्णय वनव्यवस्थापन समितीने घेतला होता़ त्यानुसार त्यांच्याकडून गेल्या 20 वर्षापासून कार्य सुरू आह़े या रोपवनात खैर, साग, अजरुन, पिंपळ, उंबर, शिसे, निम, चिंच यासह किमान 150 प्रजातींची विविध झाडे आणि शेकडो प्रकारच्या आयुव्रेदिक वनस्पतींचे संगोपन करण्यात आले आह़े याठिकाणी निर्माण होणारे गवत हे वनसमितीला देण्यात येत़े वनांचे सरंक्षण करणा:या समितीला बांबूची कमाई होत आह़े रोपवनामध्ये गेल्या 20 वर्षात मृदसंधारणाची कामे याठिकाणी झाल्याने पाण्याची पातळी वाढवण्यात यश आले आह़े60 हेक्टरमध्ये विस्तीर्ण पसरलेल्या या रोपवनाच्या परिसरात पाण्याची मुबलक उपलब्ध निर्माण केली गेल्याने झाडांचे संगोपन चांगल्या प्रकारे होत आह़े विशेष म्हणजे गेल्या एक वर्षात तब्बल सहा लाख झाडांचे टप्प्याटप्प्याने रोपण करण्यात येत आह़े समिती आणि वनविभाग यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या प्रयत्नामुळे लक्कडकोट आणि परिसरातील विहिरींची पाणीपातळी गेल्या 10 वर्षात तसूभरही कमी झालेली नाही़ याठिकाणी मजूरांना रोहयोच्या माध्यमातून बाराही महिने कामे देण्यात येत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न सुटला आह़े