शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

सॅम-मॅम बालकांच्या तपासणीसाठी पथक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गंत जिल्ह्यात आरोग्य व पोषण निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गंत जिल्ह्यात आरोग्य व पोषण निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे़ यांतर्गत अक्कलकुवा व धडगांव तालुक्यात ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी व लसीकरण, गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी आणि लसीकरण तसेच सॅम आणि मॅम बालकांचा शोध घेतला जाणार आहे़१४ जूनपर्यंत ही विशेष मोहिम सुरु राहणार आहे़ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेसाठी ९७ वैद्यकीय अधिकारी, ६५ अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि स्वयंसेवी संस्थेच्या २५ सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे़ आरोग्य केंद्रांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उपकेंद्रनिहाय तयार करण्यात आलेल्या पथकांचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अंगणवाडी केंद्रनिहाय विशेष पथकामार्फत ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करुन बालकांचे वजन, उंची,लांबी घेऊन सॅम आणि मॅम बालकांचा शोध आणि गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच ० ते ६ वर्ष वयोगटातील स्थलांतराहून परत आलेल्या लाभार्थींची स्वतंत्र यादी तयार करुन त्यांची आरोग्य तपासणी करून बाळ कुपोषणात जाऊ नये याकरिता मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. कोरोनापासून बचावाकरिता पथकातील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले ट्रिपल लेयर मास्क, फेस शील्ड, ग्लोव्हज, सॅनिटायझर, कॅप इत्यादी साहित्य पुरविण्यात आलेले आहे. अंगणवाडी स्तरावर स्क्रिनिंग करतांना लाभार्थींना टप्याटप्यात बोलविण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे, पाणी व साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची कटाक्षाने काळजी घेण्यात येणार आहे. सॅम व मॅम बालकांना मोहिमेनंतर व्हिसीडीसी, एनआरसी, सीटीसीद्वारे उपचार होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी दिली आहे.लॉकडाऊनमुळे दुर्गम भागातील बालकांच्या तपासणीचे कामकाज रखडले होते़ अंगणवाड्या बंद असल्याने सॅम-मॅम बालकांच्या नियमित बालकांच्या तपासणीचा प्रश्न होता़ पावसाळ्यात अडचणी वाढण्याची चिन्हे असल्याने जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम आखून त्यात वैद्यकीय अधिकाºयांचा समावेश करुन दिला आहे़