शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा यात्रेत चार दिवसात एक कोटींच्या घोड्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:55 IST

देशभरातील शेकडो पर्यटकांनीही घेतला चेतक फेस्टिवलचा आनंद

ठळक मुद्देजपानी अधिकाऱ्यांनी अश्व प्रदर्शनासह यात्रोत्सवात मारला फेरफटकासारंगखेडा यात्रोत्सवात ओलांडला एक कोटी रुपयांचा टप्पागुरुवारी दिवसभरात घोडे बाजारात ६९ घोड्यांची विक्रीअश्व प्रदर्शनात एक हजार ६०० घोड्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतसारंगखेडा,दि.८ : एकमुखी दत्त आणि घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रोत्सवात यंदा तीन परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली़ तसेच दर दिवशी देशभरातील शेकडो पर्यटक येथे येऊन चेतक फेस्टिवलचा आनंद लुटत आहेत़ यात्रोत्सवाच्या चार दिवसात अश्व प्रदर्शनात तब्बल १ कोटी १९ लाख ८२ हजार ७०० रुपयांची घोड्यांची विक्री झाल्याने नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.ओलांडला एक कोटी रुपयांचा टप्पासारंगखेडा येथील घोडेबाजाराने गुरुवारी एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे़ अवघ्या चार दिवसात एक कोटीपेक्षा अधिक रकमेचे घोडे विक्री झाल्याचा हा एक नवा विक्रम आहे़ गुरुवारी दिवसभरात घोडे बाजारात ६९ घोड्यांची विक्री झाली़ यातून ३२ लाख ३८ हजार ६०० रुपयांची उलाढाल झाली आहे़ आजअखेरीस ४५२ घोड्यांची विक्री करण्यात आली आहे़ यातून १ कोटी १९ लाख ८२ हजार ७०० रुपयांची उलाढाल झाली आहे़आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या छायाचित्रकार कातिया डूज यांच्यासह जपानमधील वाकायामा प्रिफेक्चर गव्हर्नमेंटचे योशियो यामाशिता आणि वाकायामा प्रिफेक्चर गव्हर्नमेंट आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे ओनिशी तात्सुनोरी यांनी चेतक फेस्टिवलला भेट दिली होती़या तीन परदेशी पर्यटकांसोबतच देशभरातील शेकडो पर्यटक दररोज यात्रोत्सवात भेटी देत आहेत़ यात विशेष म्हणजे दाखल झालेल्या एक हजार ६०० घोड्यांपैकी किमान हजार घोड्यांचे मालक, घोडे प्रशिक्षक, मार्गदर्शक, आहारतज्ज्ञ यांचा समावेश आहे़ देशभरातून आलेल्या या व्यापारी आणि प्रशिक्षकांमुळे घोडेबाजारात मिनी भारताची झलक दिसून येत आहे़ अजून १० दिवस चेतक फेस्टिवल सुरू राहणार आहे़ गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवासह देशाच्या कानाकोपºयातून दर दिवशी पर्यटक चौकशी करून चेतक फेस्टिवलची वाट धरत असल्याची माहिती आहे़ शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात पर्यटकांची गर्दी वाढण्याचा अंदाज पर्यटन विकास महामंडळाने वर्तवला आहे़