शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सजला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त बाजार चांगलाच सजला असल्याचे दिसून येत आह़े  सात दिवसाचे सात वेगवेगळे ‘डे’ साजरा करतांना त्यासाठी लागणा:या साहित्याचीही मोठी विक्री होत आहे. दरम्यान, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भातील विरोधाचा सूर उमटू लागल्याने विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे.14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमदिन साजरा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त बाजार चांगलाच सजला असल्याचे दिसून येत आह़े  सात दिवसाचे सात वेगवेगळे ‘डे’ साजरा करतांना त्यासाठी लागणा:या साहित्याचीही मोठी विक्री होत आहे. दरम्यान, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भातील विरोधाचा सूर उमटू लागल्याने विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे.14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमदिन साजरा होतो. त्यानिमित्ताने तरुणाईमध्ये गेल्या आठवडय़ापासूनच उत्सूकता आणि उत्साह दिसून येत आहे. त्या आधीच्या सात दिवसात विविध डे साजरा करण्याचेही फॅड असल्यामुळे ते देखील साजरा केले जात आहेत. गेल्या तीन दिवसात रोझ डे,  प्रपोझ डे, चॉकलेट डे, टेडी ड साजरा करण्यात आला. रविवारी प्रॉमीस डे, सोमवारी किस डे तर मंगळवारी हग डे साजरा होणार आहे. बुधवारी व्हॅलेंटाई डे साजरा होईल. रोझ डे च्या दिवशी  मोठय़ा प्रमाणावर गुलाबाचे फूल विकले गेले होते. येथील विक्रेत्यांनी शिर्डी येथून फुलांची मागणी केली होती. दररोज दोन ते तीन रुपयांना विकले जाणारे गुलाबाचे फूल त्या दिवशी पाच ते दहा रुपयांना विकले गेले. चॉकलेट डे ला अर्थात             शुक्रवारी चॉकलेटलाही मोठी              मागणी होती. विविध कंपन्यांनी त्यासाठी विशेष पॅकींगमध्ये चॉकलेट उपलब्ध करून दिले होते. दहा रुपयांपासून 200 रुपयांर्पयत चॉकलेट बाजारात उपलब्ध होते.      टेडी डेसाठी देखील मोठय़ा            प्रमाणावर विविध आकार व प्रकारातील टेडी गिप्ट स्वरूपात विक्रीस आले होते. 50 रुपयांपासून 500 रुपयांर्पयतचे टेडी येथील बाजारात उपलब्ध होते.  व्हॅलेंटाईन डे ला भेट म्हणून दिले जाणारे किचेन, बेल्ट, ब्रासलेट, घडय़ाळ, अंगठी, नेकलेस विविध आकार व प्रकारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यांनाही मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे येथील विक्रेते योगेश चौधरी यांनी सांगितले.गेल्या काही वर्षापासून काही पक्ष व संघटना व्हॅलेंटाईन डे ला विरोध करीत आहेत. हा दिवस साजरा होऊ नये म्हणून शाळा, महाविद्यालयांमध्ये जावून प्रबोधन देखील केले जात होते. त्यामुळे या दिनानिमित्त विक्री होणा:या वस्तूंवर देखील मोठा परिणाम होत होता. यंदा मात्र सर्वत्र शांतता असल्यामुळे विक्रेत्यांमध्येही समाधान आहे. परंतु नेहमीच्या अनुभवाप्रमाणे काही विक्रेत्यांनी अशा वस्तू विक्री होत नसल्याचा मागील अनुभवावरून कमी प्रमाणात अशा वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत.