शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील ऊस उत्पादकांची व्यथा : बहुतेक शेतक:यांना उसतोडीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्ह्याबाहेरील कारखान्यांवर अवलंबून असलेल्या तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे गेल्या वर्षी उसाची नोंद केली नसलेल्या शेतक:यांना यंदा उसतोड लावण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आह़े अर्थात स्थानिक कारखानदारांनी उसतोड लावून देण्याचे आश्वासन दिले आह़े परंतु तरीही सध्या नोंद असलेल्या उसाचीच तोड प्रथम केली जात आह़े यामुळे तळोद्यातील बहुतेक शेतक:यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्ह्याबाहेरील कारखान्यांवर अवलंबून असलेल्या तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे गेल्या वर्षी उसाची नोंद केली नसलेल्या शेतक:यांना यंदा उसतोड लावण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आह़े अर्थात स्थानिक कारखानदारांनी उसतोड लावून देण्याचे आश्वासन दिले आह़े परंतु तरीही सध्या नोंद असलेल्या उसाचीच तोड प्रथम केली जात आह़े यामुळे तळोद्यातील बहुतेक शेतक:यांचा बिगर नोंदीचा ऊस पडून आह़े गेल्या वर्षी नगर जिल्ह्यातील संजीवनी, कोपरगांव, कोळपेवाडी, रानवड, संगमनेर, व्दारका, विठेवाडी येथील कारखान्यांबरोबरच गुजरात मधील महुवा, दाद:या, मांडवी, मरोली,  वलसाड, कुकरमुंडा अशा डझनभर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस मोठय़ा प्रमाणात नेला होता़ या कारखान्यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने व खांडसरींपेक्षा साधारणत शंभर ते दोनशे रुपये अधिक दर दिल्यामुळे शेतक:यांचा कल तिकडेच वाढला होता़ एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील कारखान्यांकडे नोंद केलेला उसदेखील त्यांनाच दिला होता़ साहजिकच गेल्या वर्षी कारखाने व खांडसरींच्या गाळपावर प्रचंड परिणाम होऊन हंगामदेखील लवकर संपला होता़ परंतु यंदाही बाहेरील कारखाने पुन्हा आपल्याकडे येतील या आशेवर जिल्ह्यातील शेतक:यांनी उसाची प्रचंड लागवड केली़ जवळपास गेल्या वर्षाच्या तुलनेत हजारो हेक्टर क्षेत्र वाढल़े शिवाय जिल्ह्यातील तिन्ही कारखान्यांकडे नोंदसुध्दा केली नाही़ मात्र यंदा राज्यभरात उसाचे विक्रमी उत्पादन वाढल्यामुळे साखर कारखानेही पूर्ण क्षमतेने गाळप करीत आहेत़ शिवाय हे कारखाने व खांडस:या आपल्याकडे नोंद केलेल्या उसालाच प्राधान्य देत आहेत़ त्यामुळे बिगर नोंद केलेल्या ऊस उत्पादक शेतक:यांची चांगलीच गोची झाली आह़े कारण बाहेरील कारखाने यंदा जिल्ह्यात आले नाहीत़ त्याचा परिसरातच मुबलक प्रमाणात उसाची लागवड झाली आह़े त्यामुळे त्यांनी इकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरीही संकटात सापडल्याची व्यथा आह़े अशा बहुतेक शेतक:यांनी सातपुडा साखर कारखान्याकडे उसतोडीसाठी कच्ची नोंद केली आह़े कारखाने नोंदणीच्या उसाचे गाळप संपल्यानंतर घेण्याचीही संमती दर्शवली आह़े मात्र नोंदलेल्या उसाचे क्षेत्र अजून मोठया प्रमाणात बाकी असल्याने आपला ऊस केव्हा तोडला जाईल? या विवंचनेत शेतकरी सापडला आह़े अनेक शेतक:यांच्या क्षेत्रावरील उसाची वेळेवर तोड होत नसल्यामुळे त्याचे वजनही घटणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े शिवाय, एकूणच उसाच्या तोडीबाबत शेतक:यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आह़े त्या मुळे प्रशासनाने शेतक:यांची ही संभ्रमता दुर करण्याची मागणी करण्यात येत  आह़े