शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सी-लेज ठरणार ग्रामविकासाचा माईलस्टोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 12:12 IST

सिटी टू व्हिलेज अर्थात सी-लेज हा शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणीच संशोधीत उत्पादनातून आर्थिक स्तर वाढविण्याचा उपक्रम आहे. कबचौ विद्यापीठ, केव्हीके, बायफ , विज्ञान व तंत्रज्ञान आयोग बीआरसी मिळून जिल्ह्यात हा उपक्रम राबवीत आहे.-प्रा.जे.बी.जोशी

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कराजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्या सहकार्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला सी-लेज प्रकल्प मंजुर झाला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातून समृद्धी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बारीपाडा, खांडबारा, शितलपाडा, नगाव, बालआमराई या गावांचा समावेश करण्यात आला आहे. हा उपक्रम ग्रामविकासाचा माईलस्टोन ठरणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पद्मश्री प्रा.जे.बी.जोशी यांनी केले.प्रश्न : सी-लेज उपक्रमाचा उद्देश काय आहे, त्यातून काय निष्पन्न होईल?उत्तर : सी-लेजचाच अर्थ शहरातून गावात असा आहे. आतापर्यंत जे ही संशोधन होते, प्रयोग होतात ते शहर केंद्रीत राहतात. त्यामुळे गाव हा केंद्रबिंदू माणून त्या अनुषंगाने शेतकरी आणि गावकरी समृद्ध झाला पाहिजे हा उद्देश आहे. शेतीचा कस वाढविणे, शेतातून निर्माण होणारा घन कचºयाचा उपयोग करणे व त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हे देखील अपेक्षीत आहे.प्रश्न : शेतकºयांना याचा फायदा काय व कसा मिळू शकतो?उत्तर : आजच्या स्थितीत शेतातून साधारणत: ६०० मिलीयन टन घनकचरा निघतो. यातून डिझेल बनविता येऊ शकते, कोळसा कांडी तयार करता येऊ शकते. खत तयार करता येते. त्यातील काही भाग शेतातच वापरला तर शेतीचा कस वाढवता येऊ शकतो. उत्पादकता वाढविता येऊ शकते. याच घनकचºयाचा उपयोग बायोगॅससाठी देखील करता येऊ शकतो का? याचे संशोधन करण्यात येत आहे.प्रश्न : आतापर्यंत असे प्रयोग किंवा उपक्रम कुठे सुरू आहेत?उत्तर : उपक्रम म्हणण्यापेक्षा आम्ही विविध भागात भेटी देवून तेथील शेतकरी, उत्पादक समृद्ध कसा होईल, काय संशोधन करता येईल याची चाचपणी केली आहे. कोकण आणि विदर्भाचा पूर्व भागात गेलो आहेत. काजू फळापासून इथेनॉल तयार करता येते. परंतु त्यापुढे जावून आम्ही संशोधन करीत आहोत.१२ प्राध्यापक, २४ संशोधक विद्यार्थी....विद्यापीठाच्या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये संशोधन करणे, पहाणी करणे यासाठी रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे १२ प्राध्यापक, २४ संशोधक विद्यार्थी प्रा.जोशी यांच्या सोबत आहेत. विविध बाबींचा आढावा घेवून, माहिती घेवून आणि याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पहाणी हे पथक दोन दिवसात करणार आहे.उत्तर मिळाले ते वापरले गेले पाहिजे...कुठल्याही संशोधनातून उत्तर मिळाले तर ते वापरले गेले पाहिजे त्याचा उपयोग झाला पाहिजे. परंतु आपल्याकडे ते फार कमी दिसून येते. या उपक्रमातून संशोधनातून निघालेल्या निष्कार्षाचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे हा आग्रह राहणार आहे. सोशल मार्इंडसेट पदरात पाडून घेतला गेला पाहिजे. संशोधक विद्यार्थ्यांना त्यासाठीच प्रोत्साहित केले जात असते.