शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मूक आंदोलनाने प्रशासनाची धावपळ

By admin | Updated: March 4, 2017 23:49 IST

नंदुरबार : २० दिवसांपूर्वी दिलेले लेखी आश्वासन न पाळल्याने लोकसंघर्ष मोर्चातर्फे शनिवारी अचानक मूक आंदोलन करण्यात आले.

नंदुरबार : २० दिवसांपूर्वी दिलेले लेखी आश्वासन न पाळल्याने लोकसंघर्ष मोर्चातर्फे शनिवारी अचानक मूक आंदोलन करण्यात आले. तीन ते चार तास जिल्हाधिकाºयांच्या दालनाबाहेर ठिय्या धरल्यानंतर सायंकाळी शिष्टमंडळाशी चर्चा सुरू करण्यात आली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली.लोकसंघर्ष मोर्चातर्फे २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी मध्यरात्रीपर्यंत शिष्टमंडळ आणि जिल्हा प्रशासनाची विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्या वेळी आंदोलकांना लेखी आश्वासने देण्यात आली. २८ फेब्रुवारीपर्यंत त्यातील काही आश्वासने पूर्ण करण्याचे त्यात म्हटले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करीत लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता शेकडो आदिवासी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे थेट जिल्हाधिकाºयांच्या दालनाबाहेर पोहचल्यावर आंदोलकांना अडविण्यात आले. त्यामुळे त्यांनी दालनाबाहेरच ठिय्या दिला. सर्व आंदोलकांच्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मूक व आत्मक्लेश आंदोलन असल्याचे या वेळी सांगण्यात आले.तब्बल तीन तास ठिय्या धरल्यानंतर आंदोलकांना चर्चेसाठी सभागृहात बोलविण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० फेब्रुवारी रोजी काढलेल्या मोर्चाच्या वेळी मॅरेथॉन बैठक झाली होती. त्या वेळी विविध मुद्यांवर चर्चा होऊन लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्या आश्वासनांची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे तोंडावर काळी पट्टी बांधून नाईलाजाने आत्मक्लेश आंदोलन करावे लागत आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत वनपट्टे वाटप होणार होते ते झालेले नाहीत. १ मार्चपासून उपविभागीय समिती गावनिहाय दाव्यांमधील दोन पुरावे शोधून जिल्हा समितीकडे पाठवायचे व उर्वरित दाव्यांची १२ अ प्रमाणे चौकशी लावायची असे ठरले होते, परंतु त्याचे कामकाज सुरू झाले नाही. धडगाव तालुक्यातील वनाधिकार समित्यांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. नवीन दावेदारांना मोफत फॉर्म उपलब्ध करून दिले नाहीत. वनविभागाने मात्र ठरल्याप्रमाणे २७ व २८ तारखेला बैठक घेतली, मात्र उपविभागीय समिती शहादा व तळोदा यांनी कुठलेही नियोजन केले नाही. जिल्ह्यातील सूक्ष्म नियोजनात आराखडे  प्रत्येक तालुक्यातील किमान दहा गावाचे २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पाळण्यात आले नाही. जोपर्यंत नियोजन पूर्ण होत नाही व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत न हटण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला होता.या वेळी प्रतिभा शिंदे यांच्यासह यशोदाबाई भानुदास वळवी, कोनीबाई उतेसिंग पावरा, रायकीबाई मांग्या वसावे, नोंगीबाई केथा वसावे, लक्ष्मीबाई शिवराम वळवी, कलीबाई पारस पाडवी, शकीलाबाई राजकुमार तडवी आदींसह शेकडो आंदोलक उपस्थित होते.पोलिसांतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत, पोलीस निरीक्षक मेहेकर यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिष्टमंडळाशी चर्चा...लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाºयांशी जिल्हाधिकाºयांनी चर्चा केली. यावेळी खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, तळोद्याचे प्रांताधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी विविध बाबींवर चर्चा करण्यात येऊन लवकरच प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगण्यात आले.४अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांचादेखील तोकडा बंदोबस्त होता. नंतर तो वाढविण्यात आला.