याबाबत पोलिसांनी ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार इम्रान खाटीक यांनी फिर्याद दिल्याने आबीद शेख साफीद शेख, दानीश शेख आजम, साजीद शेख सलीम मेहतर, अंबालाल ठाकरे, विपूल कासारे, डेबू राजेश ठाकरे, गोविंद सामुद्रे, गोपी सामुद्रे, सुखलाल ठाकरे, बॉबी, दिनेश वळवी, दीपक ठाकरे, सचिन ठाकरे, मुकेश ठाकरे, जिवला वळवी, बनकर वळवी, अक्षय अनिल वळवी, सुरेश बाल्या ठाकरे, सुभाष पाडवी, शंकर ठाकरे, साजीद शेख सलीम, आमीन पारू कुरेशी, बल्या पारू कुरेशी, मोसीन अर्शद शेख, फिरोज युसूफ शेख, सलीम शेख, लतीफ शेख, नईम साबीर कुरेशी, फारूक बाबू कुरेशी, शाहरूख बाबू कुरेशी, सरफराज रहिम बेलदार, सलमान खान जमाल खान पठाण, अरुण बाबूलाल बेलदार, गुलाबनबी अब्दुल्ला पठाण, इम्राण भिकन कुरेशी, कालू कुरेशी व इतरांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध दंगलीचा तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रीच संशयितांची धरपकड सुरू केली होती. तपास सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी करीत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी बाजाराच्या दिवशी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुन्हा त्या भागात किरकोळ वादावादी झाली. त्यासंदर्भात दंगलीची अफवा पसरल्याने बाजारात एकच धावपळ झाली. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली, फेरीवालेही निघून गेल्याने बाजारात सामसूम झाली. तातडीने पोलीस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. त्यांनी व्यापाऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करून व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. तरीही भीतीपोटी अनेकांनी दुकाने बंदच ठेवली. त्यामुळे बाजाराचा दिवस असूनही व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
घटनास्थळासह शहरातील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गस्ती वाहनेदेखील वाढविण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता व्यवहार सुरळीत सुरू ठेवावा, असे आवाहन करून पोलीस बंदोबस्त कायम असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.
घटनास्थळी दोन्ही गटांतर्फे दगड, विटांचा मारा करण्यात आला. त्यामुळे या भागात दगडांचा खच पडला होता. तर दोन दुचाकी जाळण्याचादेखील प्रयत्न झाला होता. वेळीच पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाल्याने घा घटनेचे लोण इतरत्र पसरले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.