शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी कर्मचा:यांची ‘प्रकल्प’वर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नाशिक विभागीय आयुक्तालयाकडे तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत काम करणा:या शासकीय आश्रम शाळेतील कर्मचा:यांना विश्वासात न घेता परस्पर कमी नावे पाठविण्यात आल्याने या कर्मचारींनी बुधवारी रात्री प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेऊन तेथे अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले. या कर्मचा:यांना प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळच ताटकळत उभे केल्याने कर्मचा:यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शेवटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नाशिक विभागीय आयुक्तालयाकडे तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत काम करणा:या शासकीय आश्रम शाळेतील कर्मचा:यांना विश्वासात न घेता परस्पर कमी नावे पाठविण्यात आल्याने या कर्मचारींनी बुधवारी रात्री प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेऊन तेथे अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले. या कर्मचा:यांना प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळच ताटकळत उभे केल्याने कर्मचा:यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शेवटी प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांनी कर्मचा:यांना विश्वासात घेवून पुन्हा यादी पाठविण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचारी तेथून माघारी आले. दरम्यान नाशिक येथे पद यात्रेने आत्मदहन करण्यासाठी कर्मचारी गुरूवारी सकाळी तळोद्याहून रवाना झाले होते. राज्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रमशाळेत संपूर्ण राज्यातून साधारण चार हजारापेक्षा अधिक कर्मचारी गेल्या 10 ते 15 वर्षापासून काम करीत आहेत. एकटय़ा तळोदा प्रकल्पात साधारण 790 कर्मचा:यांचा समावेश आहे. हे कर्मचारी आपल्याला कायम करावे यासाठी शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडे सातत्याने लढा देत आहेत. गेल्या वर्षीदेखील कर्मचा:यांनी अक्कलकुवा ते नाशिक असा 250 किलोमीटर अंतराचा नाशिक येथे आपल्या कुटुंबासह बि:हाड मोर्चा नेला होता. तब्बल सात ते आठ दिवस तेथेच आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. तेव्हा आदिवासी विकास प्रशासनाने सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर वर्षभर याबाबत ठोस अशी कार्यवाही झाली नाही. आता पुन्हा कर्मचा:यांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाने पुन्हा अशा कर्मचा:यांच्या याद्या संबंधित प्रकल्पामार्फत मागविण्यात आल्या आहेत. तळोदा प्रकल्पाने सुद्धा आदिवासी विकास विभागाकडे याद्या पाठविल्या आहेत. तथापि कर्मचा:यांपेक्षा कमी नावे पाठविण्याचा आरोप होता. त्यामुळे या कर्मचा:यांनी अक्कलकुव्याहून-नाशिककडे जातांना तळोदा प्रकल्पावर बुधवारी रात्री मोर्चा काढला. त्या वेळी कर्मचा:यांच्या मोर्चास पोलिसांनी प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ रोखले. संतप्त कर्मचा:यांनी प्रकल्पाधिकारी गौडा यांना कर्मचा:यांच्या समोर चर्चा करण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे वातावरणही तणावपूर्ण बनले होते. शेवटी प्रकल्पाधिकारी मोर्चाच्या समोर आल्यानंतर यादीबाबत त्यांना कर्मचा:यांनी चांगलेच धारेवर धरले होते. प्रकल्पातील कर्मचारी सहकार्य करीत नाही, तब्बल एक-दीड तास त्यांच्याशी चर्चा झाली. शेवटी त्यांनी कर्मचा:यांना विश्वासात घेवून पुन्हा यादी पाठविण्याची हमी दिल्यानंतर हे कर्मचारी माघारी परतले. प्रकल्पातर्फे त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर गुरूवारी कर्मचा:यांनी हातोडामार्गे नाशिककडे प्रस्थान केले.