२०२१ या वर्षासाठी गुणवंत संस्थाचालक प्रा. मकरंद नगीन पाटील व पुष्पेंद्र गोवर्धन रघुवंशी तसेच प्रशासकीय क्षेत्रातील गुणवंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र व्ही कदम व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी तसेच उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांचा समावेश आहे. याशिवाय शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ महाविद्यालयाचे गुणवंत प्राध्यापक म्हणून जीटीपी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. माधव कदम, नवापूर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद बुलाकी बागुल यांचा समावेश आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील पुरस्कारार्थी शिक्षकांमध्ये शेठ के.डी. हायस्कूल तळोदा अनिल बाबूराव वायकर, अश्वस्थामा माध्यमिक विद्यालय धडगावचे कालिदास गोपालकृष्ण पाठक, श्रॉफ हायस्कूलचे हेमंत पुरुषोत्तम पाटील, ॲग्लो उर्दू हायस्कूल नंदुरबारचे असिफ इक्बाल आहद, शेख अकील शेख अहमद, मोहनसिंग कन्हैयालाल रघुवंशी प्राथमिक शाळा नंदुरबार, शशिकांत पांडुरंग पाटील विद्यासागर पब्लिक स्कूल नंदुरबार, करण उखाजी चव्हाण नगरपालिका शाळा क्र. चार नंदुरबार, सपना सयाजीराव हिरे जिल्हा परिषद शाळा अंबापूर, ता. नंदुरबार, पी.जी.पाटील, शासकीय शासकीय आश्रम शाळा धडगाव व रोहिदास आप्पा वाघ जि.प.शाळा मोलगी यांचा समावेश आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये जयेश वाणी श्रॉफ हायस्कूल,नंदुरबार.
८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व गुणवंतांना सन्मानित करण्यात येईल असे रोटरी क्लब ऑफ, नंदनगरीचे अध्यक्ष मनोज मोहन गायकवाड, सचिव अनिल सोहनलाल शर्मा व लिटरसी चेअरमन इसरार सय्यद यांनी कळविले आहे.