शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रोझवा पुर्नवसन : परसबागेतून भाजीपाल्याचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या रोझवा पुर्नवसन परिसरात ग्रामस्थांनी अंगणात परसबाग फुलवली आह़े त्यात विविध भाज्या तसेच फळभाज्यांची लागवड करुन स्वतापुरता भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येत आह़ेसातपुडा पायथ्यालगतच्या रोझवा पुर्नवसन, लक्कडकोट, वरपाडा, जीवननगर पुर्नवसन वसाहत या गावांमधील ग्रामस्थांकडून भाजीपाल्याची लागवड घराच्या परिसरातील परसबागेत करण्यात येत आह़े यासाठी ग्रामस्थांकडून मोठे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या रोझवा पुर्नवसन परिसरात ग्रामस्थांनी अंगणात परसबाग फुलवली आह़े त्यात विविध भाज्या तसेच फळभाज्यांची लागवड करुन स्वतापुरता भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येत आह़ेसातपुडा पायथ्यालगतच्या रोझवा पुर्नवसन, लक्कडकोट, वरपाडा, जीवननगर पुर्नवसन वसाहत या गावांमधील ग्रामस्थांकडून भाजीपाल्याची लागवड घराच्या परिसरातील परसबागेत करण्यात येत आह़े यासाठी ग्रामस्थांकडून मोठे परिश्रमही घेण्यात येत आह़े सध्या रब्बी हंगामातील पेरणीही अंतीम टप्प्यात आली आह़े त्यामुळे मोकळ्या वेळेत गृहिणी तसेच युवतींकडून आपापल्या घराच्या अवतीभोवती परसबागा तयार करण्यात आल्या आह़े गावातील महिलांकडून विशेषत या उपक्रमात सहभाग घेण्यात येत आह़े आपल्याला लागणा:या भाजीपाल्याचे उत्पादन परसबागेतच करण्यात येत असल्याने बाजारात जावून भाजीपाला विकत घेणे यातून त्यांचा पैसा व वेळ वाचत असल्याचेही परिसरातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े शिवाय शुध्द भाजीपालाही यातून मिळत आह़े ग्रामस्थांनी आपल्या घरातील सांडपाण्याचा निचरा या परसबागांकडे केला आह़े त्यामुळे धुणी-भांडी यात वापरण्यात येणा:या पाण्याचाही पुरेपुर वापर या माध्यमातून होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आह़े परसबागेतून मेथी, वांगे, लसण, कांदा, पालक, टोमॅटो, कोथंबीर, मुळा, भोपळा, गिलके आदी महत्वाच्या भाज्यांची लागवड करण्यात आली आह़े त्यामुळे रोज लागणारा गरजेपुरता भाजीपाला ग्रामस्थांना सहज उपलब्ध होत आह़े परसबागेचे संरक्षण व्हावे यासाठी ग्रामस्थांकडून कुंपन बांधण्यात आले आह़े यामुळे पाळीव जनावरांपासून परसबागेचे संरक्षण होत आह़े भाजीपाल्सासह परसबागेतून फळभाज्यांचेही पिक मोठय़ा प्रमाणात लावण्यात आले आह़े या परसबागेतून महिन्याकाठी मोठे उत्पादन मिळत असल्याचे सांगण्यात आल़े