शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

उंटावद येथे रोकडमल हनुमानाचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गोमाई व सुसरी नदीच्या संगमस्थळी असलेल्या उंटावद, ता.शहादा येथील रोकडमल हनुमानाची यात्रा 11 नोव्हेंबरपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गोमाई व सुसरी नदीच्या संगमस्थळी असलेल्या उंटावद, ता.शहादा येथील रोकडमल हनुमानाची यात्रा 11 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने येणा:या भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनाने सुविधा उपलब्ध करून जय्यत तयारी केली असल्याची ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिली.यासंदर्भात माहिती देतांना त्यांनी सांगितले की, रोकडमल हनुमान मंदिर देवस्थान उंटावद ग्रामपंचायत तसेच मंदिर ट्रस्टी भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी सतत तत्पर असतात. सुमारे 200 वर्षापूर्वी गोमाई नदीच्या पुरात वाहून वाहून आलेल्या हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी केली होती. परिसरातील जागृत देवस्थान म्हणून उंटावद येथील मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणा:या हनुमानाचे जागृत देवस्थान असल्याने दर शनिवारी भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. नवसाला पावणारा हनुमान म्हणून येथील देवस्थानाची प्रसिद्धी असून, येथे साखर, केळी तुला करून  रोडग्याचा महाप्रसाददेखील वाटप केला जातो.परिसरातील भक्तगण याठिकाणी मोठय़ा संख्येने दर्शनासाठी येत असून, उंटावद ग्रामस्थांनी मंदिराच्या देखरेखीसाठी व व्यवस्थापनेसाठी ट्रस्टची स्थापना केली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार सात वर्षापूर्वी करण्यात आला असून, मुख्यमूर्ती जागेवरून न हलविता मंदिराचा विस्तार करण्यात आला आहे. मंदिराची उंची सुमारे 51 फूट असून, 50 बाय 40 फुट असे दोन हजार चौरस फुटाचे आकर्षक व भव्य मंदिराची दक्षिणात्य पद्धतीने उभारणी करण्यात आली आहे. मंदिराजवळ भक्तनिवास आणि धर्मशाळा बांधण्यात आली आहे. मंदिराच्या सभोवताली बगीचा तयार करण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या निधीतून मंदिर परिसरात संरक्षक भिंत व काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या वर्षी वैकुंठ चतुर्दशीला भरणा:या यात्रेसाठी मंदिर परिसरातील साफ सफाई व अन्य कामांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष गोपाळ पाटील यांनी दिली.रोकडमल हनुमान मंदिर ट्रस्टच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष सुभाष गोपाळ पाटील, उपाध्यक्ष अजय काशिनाथ पाटील, सचिव प्रकाश सुभाष पाटील, खजिनदार चंद्रकांत लिमजी पाटील, विश्वस्त सुरेश गोपाळ पाटील, संदीप उद्धव पाटील, काशिनाथ धारू पाटील, सुनीध रमण पाटील, काशिनाथ ङिापरू पाटील, देविदास बुला पाटील, रामचंद्र राजाराम पाटील, हेमंत रामदास पाटील, विलास उद्धव पाटील असल्याची माहिती ट्रस्टींद्वारे देण्यात आली. तसेच आमदार निधीतून शहादा येथून येण्यासाठी पुलाचे बाधकाम सुरू आहे.