शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील वळण व पाटचारी अपघाताचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 12:38 IST

सोनवद-कहाटूळ रस्ता : मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ

शहादा : तालुक्यातील सोनवद ते कवठळ-कहाटूळ रस्त्यावरील वळण अपघातास आमंत्रण देणारे ठरत असून याठिकाणी बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्याने वाहनांची वर्दळ असते. मात्र अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत   आहे.सोनवद ते कवठळ-कहाटूळ हा रस्ता रहदारीचा आहे. कवठळ गावालगत कवळीद ते वरुळ कानडीकडे जाणारी पाटचारी आहे. या पाटचारीच्या दोन्ही भागाकडे संरक्षक भिंत किंवा कठडे नाहीत. आठ-दहा फूट खोल पाटचारी असून हे          ठिकाण अपघातांचे केंद्र आहे.              मध्य प्रदेशातील पानसेमलकडे जाण्यासाठी भमराटानाकामार्गे हा रस्ता सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर वाहनधारक मोठय़ा प्रमाणात करतात. या रस्त्यावरून एस.टी. बसेसह इतर अवजड वाहनांची ये-जा नेहमी सुरू असते. मात्र हा रस्त्याच्या साईडपट्टय़ा खराब झाल्याने समोरुन मोठे वाहन आले तर एका वाहनाला रस्त्याच्या खाली उतरावे लागते. साईडपट्टय़ांची दूरवस्था व त्या खोल गेल्याने वाहन रस्त्याच्या खाली घेताना अपघात होतात. साईडपट्टय़ांची खडी उखडल्याने चालक रस्त्याखाली वाहन घेण्यास धजावत नाहीत. काहीवेळा या कारणावरून चालकांमध्ये वादही होतात. या रस्त्याच्या साईडपट्टय़ा दीड ते दोन फूट खोल झाल्याने अपघात होत आहेत. संबंधित विभागाकडे रस्ता व साईडपट्टय़ांच्या दुरुस्तीसह वळण रस्ता सरळ करणे, पाटचारीच्या आजूबाजूला कठडे बसविणे तसेच फरशी पुलाची उंची वाढविण्याबाबत वारंवार मागणी करण्यात आल्याचे ग्रामस्थ व शेतक:यांनी सांगितले. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.