रस्त्यावर पडलेल्या वाळूमुळे समस्या
नंदुरबार : शहादा तालुक्यातील प्रकाशा ते तळोदा दरम्यान बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर गुजरात हद्दीत वाळूचे ठेके आहेत. येथून वाळूची वाहतूक सुरू असते. दरम्यान, वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून नेतात. यातून प्रकाशापर्यंतच्या अंतरात रस्त्याच्या दुतर्फा वाळू पडून असल्याचे दिसून येत आहेत. साईडपट्टीवर पडलेली ही वाळू दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी धोकेदायक ठरत आहे. वाळूत वाहन गेल्यास घसरून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे.
ग्रामीण भागात गप्पी मासे सोडण्याची गरज
नंदुरबार : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाची साथ सुरू आहे. अपाय झालेल्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, आरोग्य विभाग व हिवताप विभागाकडून उपाययोजना करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात सांडपाण्याने ओसंडून वाहणाऱ्या गटारी तसेच साठा केलेल्या पाण्यात निर्माण होणारे डास व मच्छर रोगांचा प्रादुर्भाव करत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांडपाणी व ज्या ठिकाणी पाणीसाठा होतो, त्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.