शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी खुला केलेला रस्ता दोन तासात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:54 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी खुला करण्यात आलेला भोणे फाटा ते वाघेश्वरी चौफुली रस्ता अवघ्या दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी खुला करण्यात आलेला भोणे फाटा ते वाघेश्वरी चौफुली रस्ता अवघ्या दोन तासानंतर पुन्हा बंद करण्यात आला. शहरवासीयांच्या नशीबी पुन्हा गाळ आणि चिखलातूनच वाट काढावी लागण्याची वेळ आली. दरम्यान, वाहतुकीच्या नियोजनाअभावी शुक्रवारी दुपारी या ठिकाणी दोन बसेसचा अपघात थोडक्यात टळला.धुळे रस्त्यावरील भोणे फाटा ते वाघेश्वरी चौफुली रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराची मनमानी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गाळ आणि चिखलातून वाहनचालकांना अगदी तारेवरची कसरत करीत वाहन काढावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार म्हणून काँक्रीटीकरणाची एक बाजू तातडीने पुर्ण करण्यात आली. मुख्यमंत्री दोन तास शहरात   होते. त्यावेळपुरता हा रस्ता केवळ त्यांच्याच वाहनांच्या ताफ्यासाठी खुला करण्यात आला. त्यानंतर तो पुन्हा बंद करण्यात आला. पर्यायी रस्त्यावर चिखल, गाळ मोठय़ा प्रमाणावर आहे ते काढणे व मुरूम टाकून भराव करण्याचे काम ठेकेदाराचे असतांना त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी दररोज या ठिकाणी लहानमोठे अपघात होत आहेत. व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. शुक्रवारी दुपारी दोन एस.टी.बस एकमेकांना घासल्या गेल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. अखेर महतप्रयासाने या बसेस तेथून काढण्यात        आल्या. याला कारण या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन नसणे. दहा मिनिटे एका बाजुने तर दहा मिनिटे दुस:या बाजुने वाहने सोडल्यास येथील रहदारीची आणि लहान, मोठे   अपघात टाळता येणार आहेत. परंतु त्याकडेही वाहतूक विभागाने दुर्लक्षच केले आहे.