लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात गेल्या आठवडाभरापासून स्थिरावलेला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा उद्रेक पुन्हा वाढला आहे. सातत्याने रुग्णांची वाढणारी साखळी तुटत नसून २ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे तर दोन दिवसात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोना महामारीपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकही प्रशासनाला प्रतिसाद देत आहेत. असे असले तरी गेल्या साडेतीन महिन्यात रुग्णांची शंभरी ओलांडल्यानंतर २ आॅगस्ट रोजी दीडशतक पूर्ण केले आहे तर शहरात आतापर्यंत बळींची संख्या १५ पर्यंत पोहोचली आहे. २ आॅगस्ट रोजी रात्री २१ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी नऊ रुग्ण रामनगर वसाहतीतील आहेत. शहरातील ८० टक्के भागातील वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे जिकडे पहावे तिकडे आता शहरात बॅरिकेटस दिसत आहेत. गल्लीबोळात नगरपालिकेमार्फत औषधी फवारणी करताना कर्मचारी दिसत आहेत. शहरात सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांबाबत प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे हेदेखील चिंतेत पडले आहेत. नागरिकांना सातत्याने आरोग्याची काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.शहरात आतापर्यंत सर्वात रुग्ण गरीब-नवाज कॉलनी, रामनगर, मच्छीबाजार, कुंभारगल्ली, संभाजीनगर, विजयनगर, कुकडेल या भागात आढळले आहेत. ग्रामीण भागातही सारंगखेडा, तोरखेडा, मंदाणे, वैजाली आदी गावांमध्ये रुग्ण आढळून आले. सारंगखेडा गावातही पुन्हा तीन दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. जिल्ह्यात नंदुरबारनंतर शहादा शहर हॉटस्पॉट बनले आहे. नुकताच आठ दिवसाच्या लॉकडाऊन लावला होता पण त्याचाही पाहिजे तसा उपयोग झाला नाही. आता प्रशासनाला नंदुरबार व शहादा शहराबाबतीत सर्व विभागातील अधिकाऱ्यांची सामूहिक बैठक घेऊन मोठा तोडगा काढावा लागणार आहे अन्यथा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहादा शहरात आता रोज रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ व त्यांचे सहकारी अधिकारी-कर्मचारी हे शहरात संसर्गजन्य भागात युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहेत. जंतूनाशक फवारणीचे काम कर्मचाºयांकडून केले जात आहे.४रविवारी २१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर पोलीस प्रशासनाकडूनही काही नियम कडक करण्यात येणार आहेत. पोलिसांकडून शहरात दररोज विविध ठिकाणी बॅरिकेटींग व पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. अनेक दुचाकीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही जण अजूनही तोंडावर मास्क न लावता बेफिरीने वागत आहेत. दुचाकीवर डबलसीट फिरणाºयांचे प्रमाणही अधिक अहाहे. शहरात विनाकारण मोटारसायकलवर हिंडणाºया व डबल सीट तसेच मोटारसायकलवर लहान मुलांना घेऊन येणाºया विना मास्क लावणाºयांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा शहादा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिला आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या शहादेकरांची चिंता वाढवणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:29 IST