शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बुराई योजनेचे सुधारित अंदाजपत्रक सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व र्पटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रय}ातून प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेस तापी पाटबंधारे विकास महामंडळाने 110 कोटी रुपये किमतीस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. या कामांचे सुधारीत अंदाजपत्रक (439.32 कोटी) राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांना सादर करण्यात आले आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व र्पटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रय}ातून प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेस तापी पाटबंधारे विकास महामंडळाने 110 कोटी रुपये किमतीस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. या कामांचे सुधारीत अंदाजपत्रक (439.32 कोटी) राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांना सादर करण्यात आले आहे, अशी माहिती नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जोशी यांनी दिली.कार्यकारी अभियंता जोशी म्हणाले की, प्रकाशा बॅरेजच्या बुडीत क्षेत्रातून पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी हाटमोहिदा गावाजवळील तापी नदीच्या तिरावरून इनटेक चॅनल व ज्ॉकवेल बांधून उपसाद्वारे 41.47 दशलक्ष घनमीटर पाणी उचलणे प्रस्तावित आहे. ज्ॉकवेलपासून एक हजार 600 मी.मी. व्यासाचा एम.एस. पाईपच्या एकेरी रांगेद्वारे पहिला टप्पा निभेंल साठवण तलावात पाणी साठविण्यात येणार आहे त्याची सिंचन क्षमता 1204 हेक्टर, दुसरा टप्पा  एक हजार 550 मी.मी. व्यासाच्या एम.एस. पाईपच्या एकेरी रांगेद्वारे आसाणे साठवण तलावात साठविण्यात येणार असून सिंचन क्षमता 2339 हेक्टर आहे. तिस:या टप्प्यात एक हजार 200 मी.मी. व्यासाच्या एकेरी रांगेद्वारे अस्तित्वातील शनिमांडळ तलावात पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिंचन क्षमता 354 हेक्टर क्षेत्र आहे. चौथ्या टप्प्यात एक हजार 200 मी.मी. व्यासाच्या एकेरी रांगेद्वारे अस्तित्वातील बुराई मध्यम प्रकल्पाची उंची वाढवून पाणी साठविण्यात येणार असून सिंचन क्षमता 3188 हेक्टर आहे. निंभेल व आसाणे साठवण तलाव बांधणे व बुराई मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे योजनेअंतर्गत प्रस्तावित आहे.निंभेल व आसाणे या नवीन साठवण तलावाची तसेच लघुपाटबंधारे योजना शनिमांडळ व बुराई मध्यम प्रकल्पाचे वाढीव व साठवण क्षमता 7085 हेक्टर असून (अवर्षण प्रवण सिंचन क्षेत्रापैकी) 3429 हेक्टर सिंचन क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यांतर्गत नंदुरबार तालुक्यातील आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका 1708 हेक्टर व साक्री तालुका 1948 हेक्टर आहे.पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रय}ाने 23 ऑगस्ट 2016 रोजी प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेतून अमरावती मध्यम प्रकल्प, लघुपाटबंधारे योजना अमरावतीनाला व वाडी शेवाडी मध्यम प्रकल्पात पाणी टाकण्यासंदर्भात मुंबई येथे झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार तत्वत: मान्यता प्राप्त झाली आहे. या तत्वत: मान्यतेच्या प्रस्तावानुसार अंतिम टप्प्यातील बुराई धरणांची उंची वाढविण्याऐवजी 18.66 दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी अस्तित्वातील लघुपाटबंधारे योजना अमरावती नाला 2.66 दशलक्ष घनमीटर, अमरावती मध्यम प्रकल्प मालपूर, ता.शिंदखेडा 10.00 दशलक्ष घनमीटर व वाडी शेवाडी मध्यम प्रकल्प, ता.शिंदखेडा येथे 6.00 दशलक्ष घनमीटर पाणी टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 2017-18 या आर्थिक वर्षात 2.00 कोटी तरतूद असून, योजनेवर नोव्हेंबर 2017 अखेर 53.01 एवढा कोटी खर्च झालेला आहे.22 उपसा सिंचन योजनांची सद्य:स्थितीतापी नदीवरील बांधण्यात आलेल्या सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधील पाणी उपसा करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने 22 सहकारी (अस्तित्वातील) उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील आठ व नंदुरबार जिल्ह्यातील 14 अशा 22 राज्यस्तर सहकारी उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरूस्ती कामांना 6 जून 2016 अन्वये रू.41.78 कोटी किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील आठ योजना शिंदखेडा तालुक्यातील असून, 26 गावांना लाभ मिळणार आहे. या योजनांमधून 5223 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, 33.80 दशलक्ष घनमीटर पाणी वापर सुरू होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 14 योजना असून, शहादा तालुक्यातील आठ व नंदुरबार तालुक्यातील सहा योजना असून, 33 गावांना लाभ मिळणार आहे. या योजनांमधून नऊ हजार 190 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, 56.70 दशलक्ष घनमीटर पाणी वापर सुरू होणार आहे. या दुरूस्तीमुळे शहादा, नंदुरबार व शिंदखेडा तालुक्यातील एकूण 59 गावांतील सात हजार 342 लोकांचे 14 हजार 413 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ही योजना सुरू करण्यासाठी सक्षम स्तरावर तांत्रिक मान्यता स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी घटकांच्या अंदाजपत्रकांना देण्यात आलेली आहे व ऑक्टोंबर 2016 पासून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रकाशा बॅरेजवरील 11 उपसा सिंचन योजना व सारंगखेडा बॅरेजवरील तीन अशा एकूण 14 उपसा सिंचन योजनेच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेशासाठी महामंडळ कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यापैकी देवकीनंदन, हरितक्रांती, उत्तर तापी तिरे, दत्त, केदारेश्वर या पाच योजनांच्या प्रस्तावास महामंडळाने मान्यता दिल्यानंतर वेद कन्स्ट्रक्शन कंपनी शहादा यांना कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले व ही कामे सुरू करण्यात आली आहेत. प्रकाशा बॅरेजवरील 11 उपसा सिंचन योजनांपैकी उर्वरित सहा उपसा सिंचन योजनांच्यव निविदा मंजुरीच्या प्रस्तावावर महामंडळ स्तरावर कार्यवाही सुरू आहे. तसेच सारंगखेडा बॅरेजवरील जयभवानी उपसा सिंचन योजना, निमगूळ व दाऊळ मंदाणे या दोन कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 28 ऑक्टोबर 2017 रोजी या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. सारंगखेडा बॅरेजवरील गायत्री उपसा सिंचन योजना कळंबू, कामेश्वर उपसा सिंचन योजना बामखेडा, रामकृष्ण उपसा सिंचन योजना कहाटूळ या तीन योजनांच्या प्रस्तावास महामंडळाने मान्यता दिल्यानंतर या कामांना कार्यारंभ आदेश देऊन कामे सुरू करण्यात आली आहेत.सारंगखेडा बॅरेजवरील शिंदखेडा तालुक्यातील उर्वरित सहा योजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदारांकडून देकार प्राप्त झालेला आहे. कार्यारंभ आदेश देण्याचे काम प्रगतीत आहे. कामास लवकरच सुरूवात करण्याचे नियोजन असून, या कामासाठी शेतक:यांची सिंचनाची निकड लक्षात घेवून शासनाने महामंडळ स्तरावर निधी उपलब्ध करून दिला आहे.