लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले समन्वयक अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काम करावे, असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक रंजन कुमार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुमाध्यम सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कुमार म्हणाले, आयोगाच्या सुचनेनुसार मतदान कक्षात टेबलची मांडणी करावी. स्ट्राँग रुममध्ये जाताना मोबाईलचा उपयोग करू नये. दिव्यांग मतदारांना आवश्यक किमान सुविधा देण्यात याव्यात व त्यांच्यासाठी आवश्यकतेनुसार सहायकाची नेमणूक करण्यात यावी. भरारी पथकातील कॅमेरामन व छायाचित्रकाराला योग्य सुचना देण्यात याव्यात. मतदारांना नियोजित वेळेत मतदार स्लिपचे वाटप होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. वितरीत न झालेल्या स्लिप जमा करण्याची जबाबदारी बीएलओ यांचेकडे सोपवावी. मतदान शांततेत होईल आणि मतदानाची टक्केवारी अधिक राहील असे प्रय} सर्व अधिका:यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख मार्गावरून अवैध दारु, प्रलोभनासाठी देण्यात येणा:या भेटवस्तू व शस्त्रांच्या वाहतुकीबाबत विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. संवादकौशल्याचा वापर करावा, असे जिल्हाधिकारी भारुड यांनी सांगितले. सादरीकरणाद्वारे मतदान तयारीची माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक पंडीत यांनी मतदानासाठी करण्यात येणा:या सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनाबाबत माहिती दिली. तर गौडा यांनी स्वीप कार्यक्रमाची माहिती दिली. बैठकीला निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या विविध समित्यांचे समन्वयक अधिकारी उपस्थित होते.
Vidhan Sabha 2019: निरिक्षकांनी घेतला तयारी व कामकाजाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:33 IST