शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

दिशाच्या बैठकीत योजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी संवेदनशिलतेने काम करावे असे यावेळी खासदार डॉ.गावीत यांनी सांगितले.बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समितीचे अशासकीय सदस्य कांतीलाल टाटीया, बबीताताई नाईक, डॉ.स्वप्नील बैसाणे, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते. बैठकीतस बोलताना खासदार डॉ.गावीत यांनी सांगितले की,  जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी देता येणे शक्य आहे. पहिल्या टप्प्यात तयार केलेल्या आराखड्यानुसार त्वरीत कामे पूर्ण करावी. ग्रामपंचायत स्तरावर माहिती घेऊन  इतर गावांचा सविस्तर आराखडा तयार करावा. त्यात सर्व पाड्यांचा समावेश होईल असे सांगितले.  तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थीस दुबार लाभ देण्या जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी. शहरी भागातील बेघर व्यक्तींना घरकूल देण्यासाठी जागेचा शोध घ्यावा. स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत सर्वेक्षण बिनचूक होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरीत करण्यात यावी. कामे वेळेवर न करणाऱ्या कंत्राटदारांवर आवश्यक कारवाई करावी. मेढाने वीजजोडणी दिलेल्या प्रत्येक घराची पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही खासदार डाॅ. हीना गावीत यांनी दिले. बैठकीत डॉ. कांतीलाल टाटीया यांनी लिहिलेल्या ‘पेसाचा वसा’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत पेसा कायद्याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे.दरम्यान बैठकीत वीज कंपनीने मेढा योजनेंतर्गत वाटप केलेल्या सोलर बॅटरी व दिव्यांबाबत जोरदार चर्चा रंगली होती. यात दुर्गम भागात बॅटरींचा स्फोट घडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या.