शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यातील खडकी येथे पाणलोट योजनेच्या कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील खडकी येथे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत व  आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले. या कार्यक्रमात एकात्मिक पाणलोट अंतर्गत राबविण्यात येणा:या योजनेतील कामांचा आढावा घेऊन माहिती देण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सुभाष गावीत, जि.प. सदस्य अंकुश गावीत, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील खडकी येथे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत व  आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले. या कार्यक्रमात एकात्मिक पाणलोट अंतर्गत राबविण्यात येणा:या योजनेतील कामांचा आढावा घेऊन माहिती देण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सुभाष गावीत, जि.प. सदस्य अंकुश गावीत, भीमसिंग गावीत, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक दीपक पटेल, शहादा वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.पी. केवठे, उपप्रकल्प व्यवस्थापक एस.आर. महाले, अक्राणीचे सहायक  वनसंरक्षक एस.आर. चौधरी, जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन मांघाडे, तालुका कृषी अधिकारी वसंत  चौधरी, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, भाजप जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सविता जयस्वाल, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रदीप वळवी, खडकीचे सरपंच विनायक गावीत, उपसरपंच रुवाजी गावीत, भीमसिंग गावीत, चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल पवार आदी उपस्थित होते. खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, एकत्मिक पाणलोटअंतर्गत अनेक योजना सरकारने दिल्या आहेत. त्यात           रॅाकेल विक्री, शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठी 44 लोकांची निवड करण्यात आली आहे. शेतक:यांसाठीच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत 296 लाभार्थीची निवड करण्यात आली आहे. जोड व्यवसायासाठी 24 हजार अनुदान व महिला बचत गटासाठी 25 हजार अनुदान व कौशल्य विकास अंतर्गत दहावी व बारावी उत्तीर्ण  मुलांसाठी ऑनलाईन व संगणक प्रशिक्षण, आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकतात असे सांगून महिला बचत गटाव्दारे बिनव्याजाने कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. उज्वला लाभार्थी योजनेत नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख गॅस जोडणी  मंजूर असून 50 हजार जोडणी वाटप झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  आमदार डॉ.विजयकुमार गावीत म्हणाले की, पाणलोट ही योजना सन 2008 पासून सुरु आहे. त्यात  ग्रीन हाऊस योजना, उपसा सिंचन योजना, जोड व्यवसायात कुक्कटपालन, शेळीपालन, संजय निराधार योजना व विविध आजारांसाठी योजना अशा 11 ते 12 योजना असल्याचे त्यांनी सांगितले. खडकीच्या माजी सरपंच सविता सुभाष गावीत, चितवीचे सरपंच दिनेश गावीत, रमेश गावीत, दौलत कोकणी, जयपाल गावीत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वागदीचे सरपंच किसन गावीत यांनी तर आभार उमेश भदाणे यांनी मानले.