शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:34 IST

निवडणूक : पाच ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा

शहादा : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला़ पाचही ग्रामपंचायतींवर काँग्रेस पक्षाने दावा केला असून निवडलेल्या निकालांच्या घोषणेनंतर पाचही गावांमध्ये लोकनियुक्त सरपंच आणि विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढण्यात आल्या़जाहिर करण्यात आलेल्या निकालात वरूळ तर्फे शहादा ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी गिरधर मंगा पाटील, जुनवणे- प्रकाश जयसिंग पवार, शिरूर दिगर-सुकलाल लक्ष्मण भिल यांचा विजय झाला़ प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात करत त्यांनी विजय मिळवला़ तर बुपकरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगलाबाई नवनीत पवार व पिंपळोद दिलवर रुबाबसिंग पवार हे बिनविरोध निवडून आले़ तालुक्यात ५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता़ दरम्यान बुपकरी व पिंपळोद ग्रामपंचायत बिंनविरोध झाली होती. शिरुड दिगर, वरुळ तर्फे शहादा व जुनवणे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते़ व वरूळ तर्फे शहादा येथील सहा तर जुनवणे येथे चार सदस्यही रिंगणात होते़शहादा येथील तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली़ वरूळ तर्फे शहादा येथे सरपंच पदासाठी थेट लढत रंगली होती़ यात गिरधर मंगा पाटील हे निवडून आले़ तर सदस्यपदी दिपक साहेबराव ब्राह्मणे, माया ओंकार भिल, चतुर गिरीधर भिल, अक्काबाई रूपसिंग भिल, गोपाल लिंबा पाटील, मुन्नीबाई शिवदास बागुल निवडून आल्या़ जुनवणे येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते यात पवार प्रकाश जयसिंग हे निवडून आले़ सदस्यपदी योगिता दशरथ बागले, प्रकाश जयसिंग पवार, कविता प्रकाश पवार, सोनल विलास पवार हे निवडून आले़ शिरुड दिगर येथे सरपंच पदासाठी चार उमेदवार रिंगणात होते़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार मनोज खैरनार ,नायब तहसीलदार रामजी राठोड, तहसील कर्मचारी किशोर भांदुर्गे, आनंद गिरासे यांनी काम पाहिले़