शहादा : तालुक्यातील ब्राrाणपुरी, सुलतानपूर व ससदे या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी रविवारी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. तिन्ही ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एका तासात म्हणजे साडेअकरा वाजेर्पयत जाहीर झाले.तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. निवडणुकीदरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे वातावरण चांगलेच तापले होते. तालुक्यातील ब्राrाणपुरी, सुलतानपूर व ससदे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपासून सुरुवात झाली. एका तासात तिन्ही ठिकाणची मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यात आले. प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार मनोज खैरनार यांनी उमेदवार व कार्यकत्र्याना मतमोजणीच्या ठिकाणी पाचारण केले होते. प्रथम ब्राrाणपुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात आली. ज्या ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत होता तेथील विजयी झालेल्यांचे समर्थक व कार्यकर्ते जल्लोष करीत होते. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. ब्राrाणपुरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाल्यानंतर शहादा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील व राजू पाटील यांच्यासह कार्यकत्र्यानी गुलालाची उधळण करीत ढोल-ताशाच्या गजरात फटाक्यांची आतीषबाजी करून जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायतनिहाय विजयी झालेले सरपंच व सदस्य असे : ब्राrाणपुरी- सरपंचपदी वंदनाबाई राजाराम मोरे (941), प्रभाग-1 अनिल शिवाजी पावरा (293), माधवराव पहाडा पाटील (259), गुंताबाई गंभीर पवार (310), प्रभाग-2 अंबालाल काशिनाथ पाटील (276), वंदनाबाई राजाराम मोरे (236), संगीता राजेंद्र पाटील (282), प्रभाग-3 जंगा वजीर मोरे (415), आजूबाई मोहनसिंग तेली (475), संगीता प्रकाश राजपूत (413).ससदे- सरपंचपदी शंकर भिला सोनवणे (665), प्रभाग-1 प्रवीण शेनू ठाकरे (बिनविरोध), निर्मलाबाई रोहिदास मोरे (बिनविरोध), सुरेखाबाई रामदास चौधरी (बिनविरोध), प्रभाग-2 कृष्णा पंडित सामुद्रे (185), लक्ष्मण भिमा कोतवाल (207), अरुणाबाई भाईदास कोतवाल (बिनविरोध), प्रभाग-3 देवीदास पिरता कोतवाल (बिनविरोध), भटीबाई शेनू ठाकरे (बिनविरोध), सुभद्राबाई किसन मोरे (बिनविरोध).सुलतानपूर- सरपंचपदी आशाबाई मोहन आवासे (994), प्रभाग-1 सुक्राम भाईदास बडे (185), संगीता गंगाराम ठाकरे (187), प्रभाग-2 राजेंद्र फुलसिंग पवार (262), सुनीता राजेंद्र पवार (294), रंजना हर्षल पवार (359), प्रभाग-3 योगेश युवराज मुसळदे (188), निशा पृथ्वीराज उखळदे (225), शिलू बालू पाडवी (210), प्रभाग-4 मोहन विश्राम उखळदे (210), वसंत चैत्राम कापडे (255), रंजिता योगेश ठाकरे (281).
शहादा तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतींचे तासाभरात निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:14 IST