शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

सी-लेजची कामे पाहून संशोधक पथक समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘विज्ञान तंत्रज्ञान आधाराने परिसरात समृद्धि आणणे’ या व्यापक उद्देशाने गेले दोन वर्ष विविध अभ्यास, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘विज्ञान तंत्रज्ञान आधाराने परिसरात समृद्धि आणणे’ या व्यापक उद्देशाने गेले दोन वर्ष विविध अभ्यास, तज्ञांचा प्रवास, चर्चासत्र, कार्यक्रम-उपक्रम खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अधिक गतीने राबवण्यात येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सी-लेज अंतर्गत ही कामे सुरू असल्याची माहिती मुंबई येथील संशोधन पथकाला देण्यात आली.स्थानीय संस्थांचे विकासातील अनुभव, विद्यापीठात तयार होणाऱ्या संशोधनाची जोड व राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे आर्थिक पाठबळ अशा त्रिवेणी संयोगातून सीलेज प्रकल्पाची तपासणी सध्या नंदुरबार जिल्ह्यात केली जात आहे. विविध अभ्यासक, संशोधकांचा प्रवास या निमित्ताने जिल्ह्यात घडणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई येथील रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जे.बी.जोशी यांचे नेतृत्वात एका चमुने जिल्ह्यात भेट दिली.कृषि विज्ञान केंद्रात डॉ.गजानन डांगे यांनी या अभ्यास गटासमोर नंदुरबार जिल्ह्यातील विकास विषयक सद्यस्थिती, आव्हाने आणि विज्ञान तंत्रज्ञान आधारित आगामी दिशा याबाबत विस्तृत मांडणी केली. जिल्ह्यातील उद्योग उभारणी यासंदर्भात नवउद्योजक यशपाल पटेल, पाचोराबारी यांनी देखील आपले अनुभव मांडले. याप्रसंगी डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, सचिव डॉ.नितिन पंचभाई तसेच नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल चे सदस्य उपस्थित होते.कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुरू असलेल्या प्रयोगाची अत्यंत तपशीलासह माहिती केंद्रातील विषय तज्ञांनी दिली. डॉ.हेडगेवार सेवा समिती मार्फत गेली १२ वर्ष खांडबारा, नवापूर परिसरातील स्थलांतर थांबवणे, रोजगार निर्मिती याबाबत कार्य सुरू आहे. देशभरातील अभ्यासक या परिसरास अलीकडे भेटी देत आहेत. मुंबई येथील अभ्यासचमुने रविवारी खांडबारा परिसरातील विविध गावांना, उद्योजक शेतकरी युवकांच्या भेटी घेतल्या. शासन, संस्था आणि समाज यांच्या बांधणीतून सुरू असलेल्या या प्रयोगतील यश पाहून अभ्यास चमुने समाधान व्यक्त केले.कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहतोंडे यांनी याप्रसंगी जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या 'मिरची उद्योगातील तंत्रज्ञान विषयक आवश्यकता' याबाबत तज्ञांशी सविस्तर चर्चा केली. चमुने थेट मिरचीच्या पथारीला भेटी दिल्या व तेथे मिरची उद्योजकांचे प्रतिनीधी राठी बंधु यांचेशी संवाद साधला.मुंबई येथील १२ प्राध्यापक व २४ संशोधक युवकांनी जिल्ह्यात या प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पहाणी केली. त्यांच्यासोबत विद्यापीठाचे विविध विभागांचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी सी-लेजची माहिती दिली.४मिरची पथारीवर जावून तेथील कामांचा आढावा देखील त्यांनी घेतला. कृषी विज्ञान केंद्रात देखील त्यांनी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची, संशोधन प्रकल्पांची आणि इतर बाबींची माहिती जाणून घेतली. सायंकाळी हे पथक मुंबईकडे रवाना झाले.