लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात २३ जणांचा अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला़ यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ५१३ झाली असून मयतांची संख्याही २८ झाली आहे़ सोमवारी मयत झालेल्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ तर एकाचा उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे मृ्त्यू झाला होता़७६ जणांच्या स्वॅबचा अहवाल मंगळवारी समोर आला होता़ यातील २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यात नंदुरबार शहरातील हरिभाऊ नगरात दोन, खोंडामाळी ता़ नंदुरबार, भाग्योदय नगर, जुनी भोई गल्ली, म्हाडा कॉलनी, देसाईपुरा, शिवाजी रोड कासार गल्ली, गुरूकुल कॉलनी येथील प्रत्येकी एक, गणेश नगर येथे चार तर धर्मराज नगरातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ शहादा शहरातील नागेश नगर, मच्छी बाजार तीन तर गरीब नवाज कॉलनी आणि वैजाली ता़ शहादा येथे प्रत्येकी एका जणाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ यातून जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही ५०० च्या पार गेली आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या दोन ठिकाणी कोविड कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे़ यात सध्या १४३ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे़ जिल्ह्यात आजअखेरीस यातील ३०७ जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़ जिल्हा रुग्णालयात आजपर्यंत ३ हजार ४७२ स्वॅब घेण्यात आले होते़ यातील २ हजार ७६८ स्वॅब हे निगेटिव्ह आले आहेत़ दरम्यान नव्याने समोर आलेल्या रूग्णांना कोविड कक्षात दाखल करण्यात येत आहे़