शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महामार्ग दुरुस्त करा अन्यथा 20 तारखेनंतर वाहतूक बंद करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:06 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था प्रवाशांना जेरीस आणत आह़े हा महामार्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था प्रवाशांना जेरीस आणत आह़े हा महामार्ग येत्या 20 नोव्हेंबर्पयत दुरुस्त न झाल्यास वाहतूक बंद पाडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून याबाबत त्यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आह़े     तळोदा आणि अक्कलकुवा या दोन शहरांच्या दरम्यान शेवाळी ते नेत्रंग आणि ब:हाणपूर-अंकलेश्वर असे दोन महामार्ग आहेत़ दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा घाट गेल्या पाच वर्षापासून घातला जात आह़े दोन्ही रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आले असल्याने जुन्या मार्गाची डागडुजी करण्याबाबतचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकार संपुष्टात आल्याची माहिती आह़े यातून गेल्या दोन वर्षात मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे रुंदावून गंभीर स्थिती निर्माण झाली आह़े हा रस्ता दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही कारवाई करण्यात येत नसल्याने अखेर नागरिक अक्कलकुवा येथून नंदुरबार जिल्ह्यातून जाण्यासाठी गुजरात राज्यातील रस्त्यांचा वापर करत आहेत़ यातून वर्दळ कमी झाली असली तरी गुजरात राज्यातून जादा अंतर कापावे लागत असल्याने त्यांचे हाल सुरु आहेत़ यात सर्वाधिक हाल शासकीय कर्मचा:यांचे होत असून त्यांना जादाचे अंतर सक्तीने कापावे लागत आह़े दरम्यान बुधवारी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी यांच्यासह अक्कलकुवा शहर आणि परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत माहिती दिली़ यावेळी त्यांनी निवेदन देत कार्यवाही करण्याची मागणी केली आह़े महामार्ग हस्तांतर झाले असल्याने त्याचे कार्यालय नेमके, कुठे आहे, याची माहिती नसल्याने दाद मागावी कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला़ अक्कलकुवा, सोरापाडा ते वाण्याविहिर फाटा यादरम्यान दोन फूट खोल आणि सात ते आठ फूट लांबीचे खड्डे पडल्याने अपघात सुरु असल्याचे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होत़े  

अक्कलकुवा शहरातून गुजरातकडे मार्गस्थ होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सोरापाडा येथील वरखेडी नदीच्या पुलाचीही गंभीर अवस्था आह़े पुलावरील डांबरीकरण पाच वर्षापूर्वीच उखडले होत़े तर यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे कठडेही वाहून गेले आहेत़ अरुंद अशा या पुलावरुन दिवसभरात शेकडो अवजड वाहने गुजरात आणि महाराष्ट्रात प्रवेश करतात़ कठडे नसलेल्या पुलावरुन पायी चालणा:यांची वर्दळ असत़े रात्रीच्यावेळी अंदाज न आल्याने अवजड वाहन थेट पुलावरुन खाली कोसळण्याची भिती असल्याने पुलाची दुरुस्ती ही सर्वाधिक गरजेची असल्याचे सांगण्यात आले आह़े 

महामार्गवर गुलीउंबर्पयतच्या महाराष्ट्र हद्दीर्पयत रस्ता खराब असल्याने पावसाळ्यात वाहने फसून वाहतूकीची कोंडी होत होती़ ही कोंडी सोडवण्यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सातत्याने मदत करुन मोलाची भूमिका बजावत होत़े पोलीस वाहनातून दगड आणून भराव करुन वाहने काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला गेला होता़ बुधवारी शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांची भेट घेत त्यांच्याजवळ महामार्ग दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता़ परंतू जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने त्यांनी नागरिकांना शांत करुन आंदोलन करण्याबाबत समज दिली होती़ त्यानंतर नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिल़े 20 नोव्हेंबर्पयत जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने त्यानंतरही रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आह़े