शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात ‘मातृवंदना’ची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:02 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’च्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े दुर्गम भागात  बँक शाखांचे जाळे नसल्याने, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले बँक खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण होत आह़ेगरीब, आदिवासी, गरोदर मातांना आर्थिक मदत व्हावी तसेच माता ...

ठळक मुद्देकाय आहे योजना.. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभार्थी गरोदर मातांना तीन टप्प्यात 5 हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात येत असत़े पहिल्या टप्प्यात गरोदरपणाची लवकरात लवकर (150 दिवसाच्या आता) नोंदणी केल्यावर 1 हजार रुपये, सहा महिन्यानंतर परंतु किमान ग

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’च्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े दुर्गम भागात  बँक शाखांचे जाळे नसल्याने, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले बँक खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण होत आह़ेगरीब, आदिवासी, गरोदर मातांना आर्थिक मदत व्हावी तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्रशासनाकडून ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ राबविण्यात येत आह़े परंतु जिल्ह्यातील दुर्गम भागात  पुरेशा बँकशाखा अद्यापही पोहचल्या नसल्याने केंद्राच्या या महत्वाकांक्षी योजनेपासून अनेकांना वंचित रहावे लागणार असल्याची स्थिती दिसून येत आह़े धडगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची केवळ एकच शाखा आह़े त्यामुळे सातपुडय़ाच्या जवळ असलेल्या या दुर्गम भागातील गर्भवती महिलांना योजनेचा लाभ घेण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात या योजनेचे महत्व अनन्य साधारण आह़े दुर्गम भागात बहुतेक महिला घरीच प्रसुत होतात़ त्यामुळे माता मृत्यू व नवजात शिशु दगावण्याच्या संख्येतही मोठी वाढ होत असत़े खाजगी दवाखान्यात ‘सिजेरियन’ तसेच प्रसुतीचा खर्च न परवडणारा असतो़ त्यामुळे मोलमजुरी  करुन आपले पोट भरणा:या या आदिवासी महिलांना घरीच प्रसुती करण्याशिवाय पर्याय नसतो़ दुर्गम भागातील गरोदर महिलांना प्रसुतीचा खर्च, आवश्यक खाद्य पुरविण्यासाठी आर्थिक मदत म्हणून केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु करण्यात आली आह़े  परंतु अशा अडचणींमुळे ही योजना अद्यापही दुर्गम भागातील लाभाथ्र्यापासून कोसो दुर असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आह़े जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून योजना राबविण्यासाठी उत्तम काम बजाविण्यात येत आहे, यात शंका नाही़ परंतु बँकाचे जाळे अधिक विस्तारणे आवश्यक आह़े