शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

प्रकाशा येथे कोरोना रुग्ण वाढल्याने उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ग्रामपंचायतीतर्फे विविध प्रभावी उपाययोजना करण्यात येत ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ग्रामपंचायतीतर्फे विविध प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. गावातील व्यावसायिकांना नोटिसा देऊन शासन नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे बजावण्यात आले. मास्क न वापरणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.कोरोनाच्या सुरुवातीच्या चार महिन्यापर्यंत प्रकाशा गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. तरीही येथे वेळोवेळी व्यापारी व ग्रामस्थांनी जनता कर्फ्यू पाळून कोरोना विषाणूला लांब ठेवले होते. मात्र १५ दिवसापूर्वी पहिला रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत रुग्णांची संख्या १३ झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रकाशा येथील ग्रामपंचायतीने कंबर कसली असून उपाययोजना करण्यात येत आहेत.गुरुवारी सकाळी सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी, पोलीस कर्मचारी सुनील पाडवी, ग्रामपंचायती कर्मचारी आदींनी गावात फिरून प्रत्येक दुकानदारांना नोटीस व सूचना दिली आहे. नोटिसीत म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्याने शहादा तालुक्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. आपल्या गावातही कोरोनाचे १२ रुग्ण बाधित आढळून आले आहे व दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. म्हणून सर्व व्यापारी व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन न केल्यास त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सर्व व्यापाºयांनी दुकानात मास्क वापरणे बंधनकारक आहे. दुकानात सॅनिटायझर ठेवणे व प्रत्येक ग्राहकास सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे बंधनकारक राहील. विनामास्क आलेल्या ग्राहकाला कुठलाही माल देऊ नये. दुकानावर एका वेळी एकच ग्राहक असेल, दोन ग्राहकांमध्ये सहा फुटाचे सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील. सार्वजनिक जागेवर थुंकल्यास १०० रुपये दंड व अत्यावश्यक काम नसताना फिरल्यास १०० रुपये दंड करण्यात येईल. तोंडावर मास्क किंवा रुमाल न लावल्यास ३०० रुपये दंड राहील. नियमांचे पालन न करणाºयांवर आपत्ती व्यवस्थापन काय्द्यानुसार कारवाई करून व एक हजार रुपये दंड वसूल केला जाईल, अशी सूचना प्रशासनाकडून सर्व व्यापाºयांना देण्यात आल्या असून गावातील मुख्य चौकातही ही नोटीस लावण्यात आली आहे.प्रकाशा गावात ज्याठिकाणी पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या परिसरामध्ये प्रकाशा ग्रामपंचायतीमार्फत फवारणी केली जात आहे व त्या परिसरात बॅरिकेटींग लावून ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावात फवारणी करावी, अशी मागणी प्रकाशा ग्रामस्थांकडून होत आहे.