शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त धरण योजनेचा अमोनी येथून शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:48 IST

दुष्काळमुक्तीसाठी उपक्रमात सहभागाचे आवाहन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : गाळमुक्त धरण अथवा तलाव योजनेंतर्गत तालुक्यातील अमोनी येथील तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ रविवारी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी जास्तीत जास्त लोकांनी दुष्काळ मुक्तीसाठी अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख अतिथींनी केले.संपूर्ण दुष्काळ मुक्तीसाठी राज्य शासनाने यंदापासून जलयुक्त धरण व तलाव ही योजना हाती घेतली आहे. या योजना शासनाच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी या विभागाला निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील पाच गावांचा या योजनेत समावेश कर ण्यात आला आहे. त्यात अमोनी, पाडळपूर, गडीकोठडा, तळवे व बोरद या गावांचा समावेश आहे. त्यापैकी अमोनी येथील गावाजवळील तलावाचा गाळ काढण्याचा शुभारंभ आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता पी.जी. ठाकरे, सरपंच चंदन पाडवी, जनसेवक योगेश पाटील, उपसरपंच दिलीप पावरा, रेवानगरचे उपसरपंच दाज्या पावरा, अनुलोम उपविभाग प्रमुख कल्पेश पाडवी, तलाठी डी.बी. हाडे, ग्रामसेवक राजेंद्र पावरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी अमादार पाडवी व जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, संपूर्ण दुष्काळ मुक्ती व पाणी टंचाईवर कायम मातस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने यंदापासून ही योजना हाती घेतली आहे. त्यामुळे या योजनेत जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रय} करण्याचे आवाहन केले. दरम्यान आमदार उदेसिंग पाडवी यांनी लोकसहभागातून या कामासाठी 50 हजार रुपये मदत देण्याचे आश्वासनदेखील दिले. स्वत: त्यांनी दहा हजाराची मदत देखील लगेच केली. गावातील तलाव व धरणात मोठय़ा प्रमाणात साचलेला गाळ आता काढला जाणार असल्यामुळे गावक:यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी या योजनेत जास्तीत जास्त गावे प्रशासनाने समाविष्ट करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.