शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या नातेवाईक उमेदवारांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून मंगळवारी मतपेटीत बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून मंगळवारी मतपेटीत बंद होणार आहे. यात आजी, माजी आमदारांच्या कुटूंबातील सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी यांचा समावेश आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवार, ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या अनेक दिग्गजांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात मंगळवारी बंद होणार आहे. दिग्गजांमध्ये प्रामुख्याने माजी मंत्री व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी डॉ.कुमुदिनी गावीत, आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र अ‍ॅड.राम रघुवंशी, अ‍ॅड.पद्माकर वळवी यांच्या कन्या अ‍ॅड.सिमा वळवी, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र दिपक व मधुकर नाईक.माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत व स्रूषा संगिता गावीत.माजी आमदार शरद गावीत यांच्या कन्या अर्चना व राजेर्षी गावीत, माजी आमदार नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी आशा पाडवी, माजी जि.प.उपाध्यक्ष व सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतिलाल पाटील यांचे पूत्र अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. या सर्वच गटांमध्ये प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या आहेत. त्यामुळे या लढतींबाबत जिल्हावासीयांमध्ये प्रचंड उत्सूकता लागून आहे.