शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन वसाहतींना यावर्षीही पूरस्थितीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यात गेल्यावर्षी विस्थापितांच्या तिन्ही वसाहतींसह इतर तीन गावांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी शिरून घरांचे मोठ्या प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यात गेल्यावर्षी विस्थापितांच्या तिन्ही वसाहतींसह इतर तीन गावांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी शिरून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संबंधीत ग्रामपंचायतींनी अथवा प्रशासनाने यातून कुठलाच धडा घेतला नाही. कारण अगदी पावसाळा तोंडावर आला असतांना गावाजवळील नद्या-नाल्यांचे खोलीकरण करण्यात आलेले नाही. संबंधीतांनी या कामांना खो दिल्यामुळे यंदाही गावकऱ्यांना पूरपरिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. निदान वरिष्ठ प्रशासनाने तरी दखल घेऊन सक्त ताकीद द्यावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या रोझवा पुनर्वसन, रेवानगर, मोड या वसाहतींबरोबरच भवर, शिर्वे व रापापूर चौगाव अशा सहा गावांमध्ये नदी-नाल्यांचे पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे नदी काठावरील शेकडो घरांचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर या रहिवाशांचा संसार उघड्यावर आला होता. मोड पुनर्वसन वसाहतीत तर सर्वांचेच नुकसान झाले होते. शासनाने या नुकसान ग्रस्तांना तुटपुंजी मदत केली असली तरी गावकऱ्यांनी उधार उसनवारीने पैसे घेऊन आपला संसार जसा-तसा पुन्हा उभा केला आहे.गेल्या वर्षी नद्या नाल्यांची ही पूर परिस्थिती लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी संबंधीत गावाच्या पंचायतींनी अथवा यंत्रणांनी निदान गावाजवळ तरी नदी नाल्यांचे खोलीकरण करणे अपेक्षित असतांना या कामांना कोणीच प्राधान्य दिले नसल्याचे चित्र आहे. कारण यंदाचा पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. तरीही कुणीही याबाबत गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. साहजिकच यंदाही संबंधित गावातील रहिवाशांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.वास्तविक नैसर्गिक आपत्ती निवारण्याच्या बैठकीत तरी नाला खोलीकरणाचा हा मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता. मात्र त्यावर चर्चा झाली नसल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच संबंधीत यंत्रणांनीदेखील या कामांना गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप आहे. या बाबत प्रशासनास विचारले असता ही कामे करण्याची जबाबदारी ग्रामपंचायती अथवा कृषी विभागाची आहे. त्याच्यासाठी निधीचीही तरतूद नसल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पावसाळ्यापूर्वीची ही कामे युद्धपातळीवर करण्याची ग्रामस्थांची अपेक्षा होती. शिवाय गेल्या नोव्हेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यात नदी-नाल्यांचे खोलीकरण व त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या होत्या. पावसाळा तोंडावर आला असतांना खोलीकरणाबाबत यंत्रणांनी कानावर हात ठेवला आहे. पुन्हा नुकसानीची वाट पाहणार आहेत का? असा प्रश्नही रहिवाशांनी केला आहे. निदान वरिष्ठ महसूल प्रशासनाने तरी याप्रकरणी चौकशी करून संबंधीतांना उपाययोजना करण्याबाबत तंबी द्यावी, अशी मागणी आहे.तळोदा नगरपालिकेने यंदाचा पावसाळा लक्षात घेऊन गेल्या १५ दिवसांपासून खर्डी नदीच्या खोलीकरणाच्या कामाबरोबरच मोठ्या गटारींच्या साफसफाईची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे पाणी तुंबण्याची शक्यता आता कमी झाली आहे. कारण थोडासा जरी मुसळधार पाऊस झाला तरी कॉलेज रस्ता, मेनरोड, बसस्थानक परिसरातील गटारींचे पाणी व्यावसायिकांच्या दुकानात शिरले होते. शिवाय नवीन वसाहतींमध्येदेखील पाणी तुंबत होते. कारण दरवर्षी पावसाळ्यात व्यावसायिकांबरोबरच वसाहतधारकांची मोठी डोकेदुखी ठरत होती. विशेषत: पालिकेने खर्डीनदीवरील पुलाचे अतिक्रमण काढल्यामुळे विद्यानगरी व आदिवासी हाट्यांमधील पाणी शिरण्याचा प्रश्न दूर झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या या कामाबाबत तळोदा शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.