शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘शापोआ’साठी शाळांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:04 IST

नंदुरबार : एप्रिलपासून ‘पीएफएमसी’ प्रणालीव्दारे शाळांच्या खात्यावर थेट अनुदान

नंदुरबार : शालेय पोषण आहाराचा अनुदान एप्रिल महिन्यापासून थेट शाळांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील शाळांकडून आपआपली माहिती आॅनलाईन पध्दतीने भरण्यात येत आहे़याआधी जिल्हा परिषदेकडून संबंधित अनुदान शाळांना प्राप्त होत होते़ परंतु अनुदान वाटपामध्ये पारदर्शकता व सुसूत्रता निर्माण व्हावी यासाठी आता थेट पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीएफएमसी प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा करण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील खाजगी, अनुदानीत प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाच्या जळपास १ हजार ७३१ शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे़ ग्रामीण व शहरी असे दोन विभाग पाडून शालेय पोषण आहाराच्या अनुदानाचे वाटप करण्यात येत असते़ यात, ग्रामीण भागातील पहिली ते पाचवीच्या प्रति विद्यार्थ्याला १ रुपया ५१ पैसे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याला २ रुपये १७ पैसे देण्यात येत असतात़ तर शहरी भागातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४ रुपये १२ पैसे तर सहावी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ६ रुपये १८ पैसे अनुदानाचे वाटप करण्यात येत असते़पहिले जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार विभागाकडून संबंधित शाळांना मागणीनुसार शालेय पोषण आहाराचे अनुदान वितरीत करण्यात येत असते़ यासाठी विभागाला जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती घेऊन त्यांच्याकडून करण्यात आलेल्या निधीची मागणी प्रत्यक्षात वितरीत करण्यात येणारा निधी आदींची गोळाबेरीज करुन अनुदानाचे वितरण करण्यात येत होते़ शालेय पोषण आहार विभागाकडून संबंधित विद्यार्थ्यांना तांदुळ देण्यात येत असतात़ तर तो शिजवण्यासाठी तसेच चटनी, तेल तसेच इतर साहित्यांचा खर्च म्हणून प्रति विद्यार्थी ग्रामीण व शहरी भागात ठरविण्यात आलेली अनुदानाची रक्कम देण्यात येत असते़दरम्यान, १ एप्रिलपासून शासनाने शालेय पोषण आहाराबाबत नवीन धोरण अंमलात आणण्याचे ठरवले आहे़ त्यानूसार पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीएफएमसी प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा करण्यात येणार आहे़ यासाठी जिल्ह्यातील संबंधित शाळांनी आपआपल्या शाळेची माहिती, विद्यार्थी संख्या, बँक खातेक्रमांक आदींची माहिती शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या एज्युकेशन महाराष्ट्र या संकेतस्थळावर भरावयाची आहे़ त्यामुळे १ एप्रिलपासून या नवीन प्रणालीची सुुरुवात होणार असल्याने जिल्ह्यातील शाळा प्रशासनांकडून आपआपली माहिती भरण्यासाठी धावपळ करण्यात येत आहे़ जिल्ह्यातील १ हजार ७३१ शाळांकडून ही माहिती भरण्याची काम संख्या सुरु आहे़दरम्यान, शाळांनी एज्युकेशन महाराष्ट्र या संकेतस्थळावर आपली सविस्तर माहिती भरावयाची आहे़ त्यासाठी संबंधित प्रत्येक शाळांना स्वतंत्र इमेल आयडी व पासवर्ड देण्यात आला आहे़ त्यामुळे संबंधित शाळांचे मुख्याध्यापक शाळेची आॅनलाईन माहिती अपलोड करीत आहेत़ दरम्यान, काही शाळांनी अद्याप माहिती भरलेली नसल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे ज्या शाळांकडून काही कारणास्तव माहिती भरण्यास विलंब झाला असेल तर अशा शाळांकडून बॅकडेटेड माहिती भरण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे़ शाळांनी लवकरात लवकर माहिती भरावी असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे़तथापि, यंदा पहिल्यांदाच पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीव्दारे शाळांच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा करण्यात येणार असल्याने या नवीन प्रयोगाचे पहिल्याच दिवशी एप्रिल फूल होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे़ विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार ही संकल्पना सुरु झाली, तेव्हापासून या ना त्या कारणाने हा विभाग नेहमीच चर्चेचा ठरत आहे़ गुणवत्ता, ठेकेदारांची नियुक्ती, पोषण आहाराचा गैरव्यवहार आदींमुळे हा विषय नेहमीच चर्चेचा ठरत आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून विशेष काळजी घेतली जात आहे़