शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पालिका रेकॉर्डचे संगणकीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 10:47 IST

सर्वसाधारण सभा : विविध विषयांना मंजुरी, पुढची सभा अखेरची ठरणार

ठळक मुद्देआणखी एक किंवा दोन सभा. पालिका निवडणुकीची आचारसंहिता साधारणत: ऑक्टोबरच्या दुस:या आठवडय़ापासून लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेची यापुढील सर्वसाधारण सभा ही शेवटची सभा राहण्याची शक्यता आहे. आज सभा झाल्यानंतर किमान दोन महिन्यात सभा घेणे आवश्यक असते. परंतु

ऑनलाईन लोकमत31 ऑगस्ट नंदुरबार : पालिकेचे कामकाज आता डिजीटल होणार असून आतार्पयतचे सर्व कागदपत्रांचा डाटा सुरक्षित करणे व त्याचे डिजीटलायङोशन करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाच्या विषयाला आणि होणा:या खर्चाला बुधवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. सभेत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी अध्यक्षा र}ा रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत विषय पत्रिकेवर एकुण 15 विषय होते. त्या सर्व विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. सध्या सर्वत्र ऑनलाईनचा जमाना आहे. पालिकेने देखील अनेक सेवा ऑनलाईन केलेल्या आहेत. ब:याच विभागांचे संगणकीकरण झालेले आहे. आता जुन्या कागदपत्रांचे डिजीटलायङोशन करण्यात येणार आहे. जुने आणि जिर्ण झालेल्या कागदपत्रांना सांभाळणे मोठे जिकरीचे काम असते. त्यामुळे अशा कागदपत्रांचे डिजीटलाङोशन करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी लागणा:या अंदाजीत खर्चाला सभेत मंजुरी देण्यात आली.बैठकीत इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. पालिका क्षेत्रात लावण्यात येणारे व्यावसायिक बोर्ड, बॅनर्स, फलक यांच्या जाहिरात कर व भाडे वसुली यासाठी अभिकर्ताची नेमणूक करण्यात येणार आहे.पालिकेने नुकतीच सुरू केलेल्या ई-लायब्ररी चालविण्यासाठी आता अभिकर्ता नियुक्त करण्यात येणार आहे. या लायब्ररीची देखभाल दुरूस्ती व परिक्षण या माध्यमातून करण्यात येणार आहे. हीच पद्धत नाटय़ मंदीराशेजारील बगिचा देखभाल व दुरूस्ती आणि परिक्षण करण्यासाठी देखील अभिकर्ता नेमण्यात येणार आहे. पालिका हद्दीतील सर्वच मतदारांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. त्याच्या अंदाजीत खर्चाला देखील यावेळी मंजुरी देण्यात आली. पालिकेने वैशिष्टयेपुर्ण योजनेअंतर्गत सव्र्हे नंबर 271 पैकी जागेत ट्रक टर्मिनन्स मंजुर अंदाजपत्रकाव्यतिरिक्त  बचत झालेल्या रक्कमेतून इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्या कामांबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली.    2016-17 या आर्थिक वर्षाचा एप्रिल ते जून अखेर जमा आणि खर्चाचा तिमाही हिशोबला मंजुरी देण्यात आली. याशिवाय इतरही विविध विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली.उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, सर्व विषय समिती सभापती, मुख्याधिकारी गणेश गिरी उपस्थित होते.