शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करा- पालकमंत्र्यांची सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रतिबंधीत क्षेत्रातील प्रत्येक संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीवर अधिक भर द्यावा. वाढणारा मृत्यूदर आटोक्यात आणावा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रतिबंधीत क्षेत्रातील प्रत्येक संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीवर अधिक भर द्यावा. वाढणारा मृत्यूदर आटोक्यात आणावा असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यानी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, आदी उपस्थित होते. अ‍ॅड.पाडवी म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्रात नागरीकांच्या प्रबोधनावर भर द्या.खाजगी कोविड रुग्णालयात शासकीय दराने सेवा दिली जाईल व नियमांचे पालन होईल यांची दक्षता घ्यावी. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्यासाठी रुग्णाची प्राथमिक लक्षणे असताना स्वॅब तपासणी होईल याकडे लक्ष द्यावे असे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री अ‍ॅड.पाडवी यांनी बैठकी दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. उपचारासाठी लागणारे इंजेक्शन व औषधे तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे टोपे यांनी मान्य केले आहे. औषधांच्या उपलब्धतेसाठी आमदार निधीतून सहकार्य करणार असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. बैठकीत महिला रुग्णालयाच्या इमारतीत कोविड हॉस्पीटल सुरु करण्याबाबत तयारी, आॅक्सिजनची उपलब्धता, कोविड हॉस्पीटल आणि कोविड केअर सेंटरची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.