शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

50 टक्क्यांवरच अडकली वसुली : नंदुरबारातील चार पालिकांची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:23 IST

अवघ्या 15 दिवसात उद्दिष्टपूर्तीचे आव्हान

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : जिल्ह्यातील चार पालिका व एक नगरपंचायतींच्या विविध करांची वसुली जेमतेम 50 टक्केर्पयत गेली आहे. वसुली उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी अवघे 15 दिवस शिल्लक असतांना उर्वरित 50 टक्के वसुली कशी होईल याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. दरम्यान, अपेक्षीत कर वसुली न झाल्यास पालिकांच्या अनुदानांना कात्री लावण्याचा इशारा यापूर्वीच नगरविकास विभागाने दिलेला आहे. मार्च अखेर स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात पालिकांच्या विविध करांच्या वसुलीसाठी तगादा लावला जातो. पालिकांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत हे पाणीपट्टी व मालमत्ता कर हे आहे. त्यामुळे त्यांच्या वसुलीकडेच जर  दुर्लक्ष झाले तर योजनांच्या निधीला कात्रीसह उत्पन्नावर देखील परिणाम होईल त्यामुळे वसुलीसाठी पालिकांच्या वसुलीसाठी आटापिटा सुरू आहे.तीन महिन्याआधीच नोटीसाविविध करांच्या वसुलीसाठी पालिकांतर्फे तीन ते चार महिने आधीच नोटीसा दिल्या जात असतात.  जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात करांचा भरणा केल्यास एकुण रक्कमेवर किमान एक टक्का रिबीट देखील दिले जाते. तरीही नागरिक करांचा भरणा करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे तीन ते चार महिने आधी नोटीसा देवूनही पालिकांना त्याचा काहीही उपयोग होत   नसल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षापासूनचे आहे.आता धावपळवसुलीसाठी आता सर्वच पालिकांमध्ये धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात केवळ नंदुरबार ही पालिका अ वर्ग दर्जाची आहे. शहादा ब तर तळोदा व नवापूर क वर्ग दर्जाच्या पालिका आहेत. धडगाव ही नगरपंचायत आहे. या पाचही  ठिकाणी कर भरणाचे चित्र फारसे आशादायी नाही. शहादा पालिकेने  या सर्व पालिकांपेक्षा थोडीफार आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.कारवाई करणारनंदुरबार पालिकेने थकीत करांचा भरणा न करणा:या नागरिकांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. यामुळे मालमत्ता थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. काही ठिकाणी जप्ती देखील केली जाणार आहे. घरगुती करासह सार्वजनिक मालमत्ता, व्यापारी प्रतिष्ठाने यांच्याकडेही मोठय़ा प्रमाणावर कर थकीत असल्यामुळे अशा करदात्यांवरही पालिकेने ठोस कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.निवडणुकांमुळे दिलासानंदुरबारसह तळोदा व नवापूर पालिकांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात झाल्या. उमेदवारीसाठी इच्छुकांकडून मोठय़ा प्रमाणावर विविध करांचा भरणा केला गेला होता. त्यामुळे वसुलीचा आकडा  काही प्रमाणात वाढला आहे.   एकटय़ा नंदुरबार पालिकेची वसुली सव्वा कोटीर्पयत गेली होती.  नंदुरबार पालिकेअंतर्गत 32 हजार 396 विविध मालमत्ताधारक आहेत़ या मालमत्ताधारकांकडून यावर्षी 16 कोटी रूपयांची करवसूली करण्याचे टार्गेट निश्चित करण्यात आले आह़े पालिका निवडणुकीच्या वेळी अर्थात 1 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत तीन कोटी 13 लाख 80 हजार 629 रूपयांचा भरणा नागरिकांकडून करण्यात आला आह़े मार्च महिन्यार्पयत ही वसुली सुरू राहणार असल्याने यात वेळोवेळी वाढ होणार आह़ेगेल्यावर्षी नोटाबंदी जाहिर झाल्यानंतर कर वसुली कशी होईल या संकटात सापडलेल्या पालिका प्रशासनाला शासनाने दिलासा देत जुन्या नोटा स्विकारण्याची मुभा दिली होती़ या पाश्र्वभूमीवर तब्बल 12 कोटी 68 लाख 66 हजार 495 रूपयांची वसुली झाली होती़ डिसेंबरअखेर्पयत सात कोटी रूपयांच्या पुढे करवसूली झाल्याने पालिका प्रशासन समाधानी होत़े नागरिकांनी करभरणा करण्याचा हा उत्साह कायम ठेवला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पालिका निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेल्या उमेदवारांनी पालिकेच्या विविध करांचा भरणा केल्याने कराची रक्कम ही एक कोटी 9 लाख 34 हजार एवढी होती. त्याचा फायदा एकुण वसुलीतील टक्केवारीच्या वाढीसाठी झाला आहे.